मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 69 वा सामना रविवारी (21 मे) खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या सलामीवीरांच्या अर्धशतकांच्या जोरावर 200 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान त्याने एका खास विक्रमाला देखील गवसणी घातली.
केवळ विजय मिळवूनच प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरण्याचे आव्हान असताना मुंबईने 200 धावांचा पाठलाग करताना सकारात्मक सुरुवात केली. ईशान किशन वेगवान सुरुवात दिल्यानंतर बाद झाला. मात्र, रोहित शर्माने संघाची जबाबदारी खांद्यावर घेताना दमदार फलंदाजी सुरू ठेवली. त्याने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानचा फायदा घेत अर्धशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 37 चेंडूवर 56 धावा केल्या. यामध्ये 8 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
आपल्या या खेळीदरम्यान रोहितने टी20 क्रिकेटमध्ये 11000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील केवळ दुसरा भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापुढे केवळ विराट कोहली असून, विराटने 11864 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन दिसून येतो. त्याने 9645 धावा केल्या आहेत. तर सुरेश रैना रॉबिन उथप्पा व एमएस धोनी यांचा क्रमांक लागतो.
आपल्या या खेळी दरम्यान रोहितने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीसाठी 5000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एका संघासाठी अशी कामगिरी करणारा तो विराट कोहलीनंतर दुसराच फळंदाज ठरला आहे. विराटने आरसीबीसाठी एकूण 7162 धावा केल्या आहेत.
(Rohit Sharma Complete 11000 T20 Runs In T20 Only Virat Ahead Him)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला मिळाला नवा ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’! मधवालच्या गोलंदाजीपुढे क्लासेन-ब्रूक गुडघ्यावर