भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. रोहितने सोमवारी (8 जानेवारी) मुंबई इंडियन्ससोबत 13 वर्ष पूर्ण केली. आजच्याच दिवशी बरोबर 13 वर्षांपूर्वी रोहितला मुंबई इंडियन्स संघात सामील केले गेले होते. दरम्यानच्या काळात रोहित आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला.
इंडियन प्रीमियर लीग 2011 (IPL 2011) पूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा भाग बनला. त्याआधी रोहित डेक्कन चार्चर्ससोबत 2009 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकला होता. मुंबईसाठी हा फलंदाज पुढे जाऊन पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणार होता. 2011 हंगामात सचिन तेंडुलकर (123 धावा) आणि लसिथ मलिंगा (10 विकेट्स) यांनी मुंबई संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले. संघ यावेळी प्लेऑफपर्यंत मजल मारू शकला. आयपीएल 2012 मध्ये सचिनने कर्णधारपद सोडल्यानंतर हरभजन सिंग मुंबईचा नवा कर्णधार बनला. याच हंगामात रोहितने आपले पहिले आयपीएल शतक कोलकाता नाईट रायडर्संसोबत ठोकले. याही हंगामात संघ प्लेऑपर्यंतच पोहोचू शकला.
आयपीएल 2013 साठी मात्र मुंबईच्या ताफ्यात दिग्गज रिकी पाँटिंगचे आगमन झाले. पाँटिंग आणि सचिन हे दोन दिग्गज या हंगामात मुंबईसाठी एकत्र खेळले. याच हंगामात जसप्रीत बुमराह यानेही मुंबईच्या ताफ्यात जागा बनवली. पाँटिंग संघात सामील झाल्यानंतर त्याला कर्णधारपद दिले गेले होते. पण अर्ध्या हंगामातून त्याने दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतली आणि रोहितला मुंबईचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले गेले. मुंबईने यावर्षी होम ग्राऊंडमधील सर्व सामने जिंकले. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएल 2013चा अंतिम सामना गाठला आणि चेन्नई सुपर किंग्जला मात देखील दिली. ही मुंबईसाठी पहिलीच आयपीएल ट्रॉफी होती. आयपीएल 2013 नंतर सचिन तेंडुलकर याने या लीगमधून निवृत्ती जाहीर केली.
पुढचे आयपीएल 2014 मध्ये रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्समध्ये जहीर खान याचे पुनरागमन झाले. यावर्षी संघ प्लेऑफपर्यंत मजल मारू शकला होता. आयपीएल 2015 मध्ये मुंबईने पुन्हा एकदा विजेतेपद मिळवले आणि यावेळीही संघाचे नेतृत्व रोहितने यसश्वीरित्या पार पाडले होते. 2016 हंगामाचा शेवट मुंबईने पाचव्या क्रमांकावर केला. आयपीएल 2017 मुंबईला माहेला जयवर्धने यांचे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन लाभले. हा हंगामात मुंबईने आपली तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकली.
#OnThisDay, 13 years ago, Rohit turned Blue & Gold 💙#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/lHTIlB1vDr
— Mumbai Indians (@mipaltan) January 8, 2024
आयपीएल 2018 सूर्यकुमार यादवसाठी हंगाम महत्वाचा ठरला. सूर्यकुमारने यावर्षी 512 धावा केल्या होत्या. आयपीएल 2019 मध्ये रोहित शर्माने मुंभई इंडियन्सला चौथ्यांना आयपीएल चॅम्पियन बनवले. तसेच आयपीएल 2020 मध्ये मुंबई आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकला. मागच्या तीन आयपीएल हंगामांमध्ये मुंबईला एकही विजेतेपद मिळाले नाही. पण आगामी आयपीएल हंगामात रोहित मुंबईचा कर्णधार नसेल. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात संघ काय प्रदर्शन करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
रोहितच्या एकंदरीत आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत 243 सामने खेळले आहेत. यात 29.57च्या सरासरीने आणि 130.04च्या स्ट्राईक रेटने 6211 धावा केल्या आहेत. यात 42 अर्धशतके आणि एक शतक सामील आहे. गोलंदाजाच्या रुपात रोहितने आयपीएलमध्ये 15 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! आफ्रिकन दिग्गजाची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती, कारकिर्दीत खेळलाय फक्त 4 सामने
मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत धक्कादायक अपडेट, ‘या’ मोठ्या मालिकेतून होऊ शकतो बाहेर