सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या मालिकेचा भाग नाही. या मिळालेल्या वेळामध्ये त्याने नुकतेच अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आपल्या क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले. यादरम्यान त्याला चाहत्यांची मोठी पसंती लाभली.
रोहितने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले. तेथील त्याच्या काही स्थानिक क्रिकेट मित्रांच्या मदतीने त्याने क्रिक किंगडम नावाची ही अकादमी सुरू केली आहे. या अकादमीच्या उद्घाटना वेळी तो स्वतः हजर राहिला होता. हा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आमंत्रित केला गेला तेव्हा, तेथे हजर असलेल्या त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma craze in the USA. pic.twitter.com/4q0j7Gvw0u
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 6, 2023
याच कार्यक्रमात बोलताना रोहित याने आपण पुढील वर्षी अमेरिकेत होत असलेल्या टी20 विश्वचषकात भाग घेण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले. रोहित मागील वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर अद्याप एकही टी20 सामना खेळला नाही. त्यामुळे तो आगामी विश्वचषकात संघाचा भाग असेल की नाही याबाबत नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण होते. मात्र, आता त्याने स्वतः याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
रोहितला 2021 टी20 विश्वचषकानंतर संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. भारताने त्यानंतर सातत्याने द्विपक्षीय मालिका जिंकल्या. मात्र, ऑस्ट्रेलियात झालेला टी20 विश्वचषक भारताला जिंकण्यात अपयश आले. त्यानंतर हार्दिक पंड्या सातत्याने संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. मात्र, नियमित कर्णधार म्हणून अद्याप त्याच्या नावाची घोषणा झाली नाही.
(Rohit Sharma Huge Fans Crowd In California At Academy Opening)