जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून इंग्लंड संघाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी, भारतीय संघाला तीन आठवड्यांची सुटी मिळाली होती. आता या सुटीचा कालावधी संपलेला असून भारतीय संघाने डरहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतसाठीची तयारी सुरू केली आहे. सरावाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने एक ट्वीट करत सरावाला सुरुवात केल्याचे सांगितले.
रोहितने केली सरावाला सरावाला सुरुवात
सुटीचा कालावधी संपल्यानंतर भारतीय संघ डरहॅम येथे एकत्र झाला असून त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. याबाबत अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या. संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने ट्विट करत लिहिले, ‘हाथ में बल्ला और बल्ले के बीच से निकलती गेंद… इसका फिल ही अलग है।’ (हातात बॅट आणि बॅटच्या मधोमध लागून जाणारा चेंडू… हा भावच वेगळा आहे.)
त्याच्या या ट्वीटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय. कसोटी सलामीवीर म्हणून रोहितचा हा पहिलाच इंग्लंड दौरा आहे.
हाथ में बल्ला और बल्ले के बीच से निकली गेंद… इस्का ???????????????? ही अलग है! ???? pic.twitter.com/GsPHhnL2dw
— Rohit Sharma (@ImRo45) July 17, 2021
भारतीय संघ खेळणार सराव सामना
भारतीय संघाला कसोटी मालिकेपूर्वी २० जुलैपासून काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरूद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेले चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर या सराव सामन्यात लक्ष असेल. त्यानंतर भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथे खेळला जाणार आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू- अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला
महत्त्वाच्या बातम्या –
‘मुंबईकर’ सूर्यकुमार यादव करणार वनडे पदार्पण! स्वतः कर्णधाराने केली पुष्टी
तब्बल ७ फूट ४ इंच उंची लाभलेली चौदा वर्षाची बास्केटबॉलपटू, व्हिडिओ होतोय व्हायरल