बंगळुरु। उद्या(19 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात रोहितने जर 4 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वनडे कारकिर्दीत 9000 धावा पूर्ण करेल. त्याचबरोबर तो सर्वात जलद 9000 वनडे धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरेल.
सध्या वनडेमध्ये सर्वात जलद 9000 धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर विराट कोहली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स आहे. विराटने 194 वनडे डावात 9000 धावांचा टप्पा पार केला होता. तर डिविलियर्सने 205 डावात हा पराक्रम केला होता.
त्याचबरोबर या यादीत सध्यातरी विराट आणि डिविलियर्सच्या पाठोपाठ गांगुली आहे. गांगुलीने 228 डावात 9000 वनडे धावा पूर्ण केल्या होत्या.
रोहितच्या सध्या वनडेमध्ये 223 वनडेतील 216 डावात 48.89 च्या सरासरीने 8996 धावा आहेत. त्यामुळे रोहितला सर्वात जलद 9000 वनडे धावा करण्याच्या यादीत गांगुलीला मागे टाकण्याची संधी आहे. उद्या जर रोहितने हा विक्रम केला तर तो 9000 वनडे धावा पूर्ण करताना गांगुलीपेक्षा 10 डाव कमी खेळलेला असेल.
वनडेमध्ये सर्वात जलद 9000 धावा करणारे फलंदाज (18 जानेवारी 2020 पर्यंत) –
194 डाव – विराट कोहली
205 डाव – एबी डिविलियर्स
228 डाव – सौरव गांगुली
235 डाव – सचिन तेंडुलकर
239 डाव – ब्रायन लारा
द्रविडबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल केएल राहुलने केले मोठे भाष्य; म्हणाला…
वाचा????https://t.co/JnjeK4aiky????#म #मराठी #Cricket #INDvAUS #RahulDravid @klrahul11— Maha Sports (@Maha_Sports) January 18, 2020
बापू नाडकर्णी यांच्या निधनानंतर सचिन तेंडूलकरने केले भावूक ट्वीट
वाच- ????https://t.co/awuEM8yiet????#म #मराठी #Cricket @sachin_rt
— Maha Sports (@Maha_Sports) January 18, 2020