---Advertisement---

रोहित शर्माचा साधेपणा! भर रस्त्यात थांबून दिल्या चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; सुंदर VIDEO व्हायरल

---Advertisement---

भारतीय कर्णधार रोहित शर्मा नुकताच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता. आता त्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भारतीय कर्णधाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो भर रस्त्यावर एका महिला चाहतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतोय.

व्हिडिओमध्ये रोहित शर्मा करोडो रुपयांची लॅम्बोर्गिनी कार चालवत असल्याचं दिसतं. रोहितला पाहून चाहते थांबतात. यावेळी एक महिला चाहतीही तेथे उपस्थित असते. ही महिला चाहती रोहितशी हस्तांदोलन करते. इतक्यात मागून आवाज येतो की तिचा (महिला चाहतीचा) आज वाढदिवस आहे. हे ऐकताच रोहित शर्मा भर रस्त्यात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. यानंतर या महिला चाहतीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

रोहित शर्मा अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर त्याच्या लॅम्बोर्गिनी कारमध्ये फिरताना दिसतो. हिटमॅन या कारची किंमत जवळपास 3.10 कोटी रुपये आहे. ही कार केवळ तिच्या किमतीसाठीच खास नाही, तर या कारचा क्रमांक 0264 आहे, जो रोहित शर्माचा वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा (264 धावा) विक्रम आहे.

रोहित शर्मानं 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो टीम इंडियासाठी केवळ एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळतो. रोहितनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 61 कसोटी, 265 एकदिवसीय आणि 159 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. हिटमॅननं कसोटीत 4179 धावा, वनडेमध्ये 10866 धावा आणि टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये 4231 धावा केल्या आहेत.

हेही वाचा – 

आयसीसी रँकिंग : अर्शदीप सिंगची टॉप 10 मध्ये एंट्री! हार्दिक पांड्यालाही बंपर फायदा
अजिबात ब्रेक नाही! कसोटी मालिकेसाठी हिटमॅनची जोरदार तयारी, VIDEO पाहा
धोक्याची घंटा! जो रुट थांबायचं नाव घेईना, सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड लवकरच मोडला जाणार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---