भारत आणि इंग्लंड या उभय संघातील तिसरा कसोटी सामना नुकताच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला आहे. या सामन्यात यजमान भारतीय संघाने विजयी घोडदौड कायम राखत १० विकेट्सने इंग्लंडवर मात केली आहे. भारतीय संघाच्या विजयात फिरकीपटू अक्षर पटेल आणि आर अश्विन यांच्याबरोबर सलामीवीर रोहित शर्मानेही मोलाचे योगदान दिले. याचा फायदा त्याला आयसीसीने जाहीर केलेल्या जागतिक कसोटी क्रमवारीत झाला आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतील कामगिरीचे रोहितला मिळाले फळ
आज (२८ फेब्रुवारी) आयसीसीने घोषित केलेल्या फलंदाजांच्या ताज्या जागतिक कसोटी क्रमवारीत रोहितने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्थान पटकावले आहे. त्याने ७४२ गुणांची कमाई करत ६ स्थानांची प्रगती केली आहे. यासह चौदाव्या स्थानावरुन त्याने थेट आठव्या स्थानावर ताबा मिळवला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहितने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. ११ चौकारांच्या मदतीने त्याने ६६ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात २५ धावांची छोटेखानी पण महत्त्वपुर्ण खेळी त्याने केली होती. एवढेच नव्हे तर, त्याआधी दुसऱ्या कसोटीत त्याने १६१ धावा करत झुंजार दीडशतक ठोकले होते.
India opener Rohit Sharma storms into the top 10 to a career-best eighth position in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings for batting 💥
Full list: https://t.co/AIR0KN4yY5 pic.twitter.com/Hqb9uTWnzJ
— ICC (@ICC) February 28, 2021
चेतेश्वर पुजाराची घसरण
याउलट खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराला २ स्थानांचे नुकसान झाले आहे. तो आठव्या स्थानावरुन दहाव्या स्थानी घसरला आहे. तर कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. याव्यतिरिक्त इंग्लंडचा एकमेक क्रिकेटपटू अर्थाच कर्णधार जो रूट याचा टॉप-५ मध्ये समावेश आहे. तो आधीच्या चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
युवा धुरंधरचा धुमाकूळ, षटकार-चौकारांसह विरोधकांची धोबीपछाड; ५९ चेंडूत केल्या १२८ धावा
वाढदिवस विशेष: टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, वाचा त्याची कहाणी
कॉमेंट्रेटरने हेअरस्टाईलवर टिप्पणी करताच भडकला डेल स्टेन, ट्विट करत म्हणाला…