भारत-इंग्लंड (India vs England) संघातील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार शतक झळकावले आहे. रोहितने 76 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दरम्यान त्याने 76 चेंडूत 102 धावा करत शानदार पुनरागमन केले.
गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा (Rohit Sharma) खराब फॉर्ममधून जात होता. कटकमध्ये 11 महिन्यांनी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत त्याने माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडला (Rahul Dravid) मागे टाकले. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरची (David Warner) बरोबरी केली. रोहितने 76 चेंडूत 9 चौकारांसह 7 षटकारांच्या मदतीने शतक झळकावले.
रोहित शर्माने यापूर्वी मार्च 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते. 11 महिन्यांनंतर, त्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले. त्याने ऑक्टोबर 2023 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावले. 2024 मध्ये भारतीय संघाने फक्त 3 वनडे सामने खेळले. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले 49 वे शतक झळकावले.
इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्माची बॅट शांत राहिली. तो केवळ 6 धावा करून तंबूत परतला. पण दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने शानदार पुनरागमन करत विक्रमी शतक झळकावले. कटकच्या मैदानावर रोहित चांगल्याच फाॅर्ममध्ये होता. प्रथम त्याने 30 चेंडूत अर्धशतक झळकावले नंतर त्याच लयीत फलंदाजी करताना रोहितने फिरकीपटू आदिल राशिदच्या चेंडूवर पुढे येऊन खणखणीत षटकार ठोकत शतक पूर्ण केले.
वनडेमध्ये सर्वाधिक शतके
50 – विराट कोहली
49 – सचिन तेंडुलकर
32 – रोहित शर्मा*
30 – रिकी पाॅन्टिंग
28 – सनथ जयसूर्या
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके (भारतीय खेळाडू)
100 – सचिन तेंडुलकर
81 – विराट कोहली
49 – रोहित शर्मा*
48 – राहुल द्रविड
38 – सौरव गांगुली
38 – वीरेंद्र सेहवाग
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; टीकाकारांना रोहितचे उत्तर झळकावले शानदार अर्धशतक
AUS vs SL; कांगारूंनी रचला इतिहास, 14 वर्षांनंतर केली अशी कामगिरी
IND vs ENG; युवा खेळाडूवर भडकला भारतीय कर्णधार! म्हणाला, “मेंदू कुठे…”