कर्णधार रोहित शर्मा याने वनडे विश्वचषक 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने विश्वचषकात सुरुवातीच्या सात पैकी सातही सामने जिंकले आहे. गुरुवारी गुणातिलेकील पहिल्या क्रमांकावरील भारत आणि दुसऱ्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिका आमने सामने होते. कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर रोहित शर्माने भारतील संघाला वेगवान सुरुवात दिली आणि खास विक्रमही नावावर केले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील हा सामना रविवारी (5 नोव्हेंबर) कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. भारताने यासामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल भारतासाठी डावाची सुरुवात करायला खेळपट्टीवर आले. रोहित शर्मा (Rohit Sharma) अगदी पहिल्यापासून आक्रमक फलंदाजी खरत होता. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, 24 चेंडूत 40 धावा केल्यानंतर त्याने विकेट गमावली. रोहितने या खेळीत 6 चौकार आणि 2 अप्रतिम षटकार मारले. सोबतच तो वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार माराणारा कर्णधार ठरला. त्याचसोबत रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडूही ठरला आहे.
वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार यापूर्वी ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) होता. मॉर्गनने 2019 विश्वचषकात इंग्लंडचे नेतृत्व करताना 22 षटकार मारले होते आणि संघाला विजेतेपद देखील मिळवून दिले होते. आता या यादीत रोहित शर्मा 22 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. रोहितने विश्वचषक हंगामातील सुरुवातीच्या आठ सामन्यांमध्येच 22 षटकारांचा टप्पा गाठला आहे. येत्या काही सामन्यांमध्ये हा आकडा अजून वाढू शकतो. यादीत तिसरा क्रमांक एबी डिविलियर्स आहे. डिविलियर्सने 2015 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाच्या कर्णधाराच्या रुपात 21 धावा केल्या होत्या. (Rohit Sharma holds the distinction of hitting the most ODI sixes in a year)
कर्णधार म्हणून विश्वचषक हंगामात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
22 – रोहित शर्मा (2023)*
22 – ऑयन मॉर्गन (2019)
21 – एबी डिविलियर्स (2015)
रोहित शर्मा 2023 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्यातही विश्वचषक सुरू झाल्यापासून त्याने काही अप्रतिम खेळी केल्या आहेत. परिणामी रोहित एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम एबी डिविलियर्स (AB de Villiers) याच्या नावावर होता. डिविलियर्सने 2015 मध्ये सर्वाधिक 58 वनडे षटकार मारले होते. रोहितनेही रविवारी वर्षीतील 58षटकार पूर्ण केले. येत्या काही सामन्यांमध्ये त्याच्या षटकारांचा आकडा नक्कीच वाढू शकतो.
एका वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
58 – रोहित शर्मा (2023)*
58 – एबी डिविलियर्स (2015)
56 – ख्रिस गेल (2019)
48 – शाहिद आफ्रिदी (2002)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
महत्वाच्या बातम्या –
कोलकात्यात टॉस जिंकून रोहितचा दक्षिण आफ्रिकेला धक्का! बावुमासेनेत मोठा बदल, पाहा Playing XI
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी कोच द्रविडचे सहाव्या गोलंदाजाविषयी मोठे विधान, लगेच वाचा