ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट्सने विजय मिळवला. दोन्ही संघातील पुढील सामना ७ जानेवारीपासून सुरु होणार आहे. तत्पुर्वी मिळालेल्या अवकाशात भारतीय क्रिकेटपटू मेलबर्नच्या एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले असता एका चाहत्याने नकळत त्यांच्या जेवणाचे बील भरले. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्याने बीलचा फोटोदेखील शेअर केला आहे. यानंतर चाहत्यांनी रोहित शर्मासह इतर उपस्थित खेळाडूंना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
रोहितने बीफ खाल्याचे सांगत केले सोशल मीडियावर ट्रोल
माध्यमांतील वृत्तानुसार, रोहितसोबत नवदीप सैनी, पृथ्वी शॉ, शुबमन गिल आणि रिषभ पंत मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यांच्या बाजूला भारतीय संघाचा चाहता नवलदीप सिंग त्याच्या पत्नीसह जेवण करत बसला होता. आपल्या बाजूला आपले आवडते भारतीय क्रिकेटपटू जेवण्यासाठी आले आहेत, हे पाहून तो भलताच खूश झाला. त्याने क्रिकेटपटूंप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना न सांगता त्यांच्या जेवणाचे बील भरले आणि त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पण त्याने त्या बिलावरील पदार्थांची नावे हाताने झाकली होती.
मात्र, या बीलमध्ये बीफ (गोमांस) आणि पोर्क या मांसाहारी पदार्थांचा समावेश असल्याचे सांगत काही चाहत्यांनी भारतीय खेळाडूंना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यातही अधिकतर चाहत्यांनी विस्फोटक फलंदाज रोहितवर निशाना साधला आहे. असे असले तरी हे बील खरे आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही.
मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या कथित बीलाच्या फोटोवर कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले आहे की “शर्माजींचा मुलगापण बीफ खातो”. एका चाहत्याने तर “भारतीय खेळाडू जय शहा आणि सौरव गांगुलीच्या डोळ्यांआड बीफ खात आहेत”, असे म्हणत बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
#beef #beef #RohithSharma #IndianCricketTeam #viratkholi
After the Indian Hindu cricketers eat beef .
Le bhakts and sanghis be like: pic.twitter.com/bZfS7uKWEA— altaf???? (@Altaf_P7) January 3, 2021
Sharma ji ka ladka bhi beef khata hai ????♂️
— सनकी (@snkii__) January 2, 2021
https://twitter.com/vigil_nte/status/1345347589101809664?s=20
Fan after paying #RohithSharma restaurant bill : pic.twitter.com/tXmePwkgVX
— Mr. Stark (@Mr_Stark_) January 3, 2021
https://twitter.com/True_Indian8/status/1345586799033241600?s=20
#RohithSharma
Nothing to defend for Rohit Sharma fans, YES HYPOCRISY???????? pic.twitter.com/DvDU8oe7HM— Himanshu Pathak (@PathaakHimanshu) January 3, 2021
#IndianCricketTeam eating hehehe #Beef ???? under the watchful eyes of Jay Shah and Dada ???? #releasemunawarfaruqui pic.twitter.com/drxrAQcV7d
— चाय वाला???????? (@Andhbhaktdilse) January 3, 2021
असे असले तरी, काही चाहत्यांनी रोहितची पाठराखण केली आहे. “रोहित शुद्ध शाकाहारी पदार्थ खाणारा व्यक्ती आहे. विनाकारण त्याला या प्रकरणात ओढले जात आहे”, असे लिहत चाहत्याने नाराजी व्यक्त केली आहे. परंतु कितपत हे बील खरे आहे, हे सांगणे कठीण आहे.
https://twitter.com/RohitianShubham/status/1345369806866763776?s=20
Because of eating #beef do not questioning on the nationality of #RohithSharma , because he make to pride every Indian's in #Cricket pic.twitter.com/jrjYroWeyq
— altaf???? (@Altaf_P7) January 3, 2021
— altaf???? (@Altaf_P7) January 3, 2021
हे बिल भारतीय क्रिकेटपटूंना पडले महागात
ज्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना कळाले की या चाहत्याने बिल भरले, तेव्हा त्यांनी त्याच्याशी संवाद साधत त्याला बिलाचे पैसे घेण्याचा आग्रह केला, मात्र नवलदीपने ते पैसे घेतले नाहीत, असा दावा नवलदीपने त्याच्या ट्विटरवर केला आहे.
मात्र यानंतर कोरोना नियमांचा मुद्दा समोर आणत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने देखील या बाबीची गंभीर दखल घेतली असून सर्व ५ खेळाडूंना भारतीय संघापासून वेगळे करून एका वेगळ्या बायो बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. यात खेळाडूंना सराव करण्याची संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नक्की त्या चाहत्याने असे रोहित पंतच्या हाॅटेल बीलाचे पैसे दिले तरी किती?
जोर का झटका.! चाहत्याशी जवळीक भारतीय खेळाडूंना भोवली, रोहितसह ‘हे’ ५ जण पुन्हा आयसोलेशनमध्ये