Loading...

डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया आणि एनिमल प्लॅनेटसोबत रोहित शर्माची गेंड्यांसाठी बॅटिंग

मुंबई। रोहित शर्मा हा भारताचा स्टार बॅटसमन रोहित4रिनोज (रोहितचा गेंड्यांसाठी पुढाकार) हे अभियान डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया आणि एनिमल प्लॅनेटच्या भागीदारीमध्ये राबवत आहे. त्याद्वारे विशाल एकशिंगी गेंडे अर्थात् भारतीय गेंड्यांच्या संवर्धनाच्या गरजेसाठी जागरूकता होण्यास मदत होईल.

22 सप्टेंबर ह्या जागतिक गेंडा दिवसानिमित्त राबवण्यात येणा-या एनिमल प्लॅनेटच्या ह्या अभियानामधील सहभागाद्वारे रोहित लोकांना ह्या संकटात आलेल्या प्रजातीला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

जगामध्ये उरलेल्या अंदाजे 3500 भारतीय गेंड्यांपैकी 82% पेक्षा जास्त गेंडे भारतामध्ये आढळतात. एके काळी सिंधू, गंगा आणि ब्रह्मपूत्र नदीच्या खोऱ्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात आढळणारा हा प्राणी आता आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील अगदी थोड्या छोट्या वस्तीस्थानांमध्येच आढळतो. आसामचा राष्ट्रीय प्राणी असलेला भारतीय गेंडा अनेक संकटांमध्ये अडकलेला आहे. ज्यामध्ये शिकार, वस्तीस्थानाची हानी आणि आंतर- संकरामुळे व रोगांमुळे होणारे मोठे मृत्यु अशा बाबींचा समावेश आहे.

संवर्धनाच्या क्षेत्रामधील पाच दशकांच्या कामाच्या अनुभवासह, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया भारतातील गेंडा आढळणा-या प्रमुख प्रदेशांमध्ये गेंडा संवर्धनावर कार्यरत आहे. 2018 मध्ये गेंडा संवर्धनाचा ब्रँड एंबेसेडर म्हणून रोहीत शर्माने डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडीयासोबत काम सुरू‌ केले. आता आघाडीचे वन्य प्राण्यांचे चॅनल असलेल्या एनिमल प्लॅनेटने ह्या उपक्रमात सहभाग घेतल्यानंतर ही टीम आता ह्या प्रजातींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि भारताला ह्या प्रजातीच्या संवर्धनाच्या गरजेविषयी संवेदनशील करण्यासाठी कार्यरत आहे.

Loading...

16 सप्टेंबर पासून जागतिक गेंडा दिवस साजरा करण्यासाठी एनिमल प्लॅनेट एक आठवडाभराचा विशेष गेंडा सप्ताह कार्यक्रम सादर करेल आणि ह्या नाजुक महाकाय प्राण्यांबद्दल लोकांना जागरूक करेल. ह्या मोहीमेला बळकटी देण्यासाठी www.rohit4rhinos.org हे एक विशेष पेजसुद्धा बनवले गेले आहे व इथे येऊन दर्शक ह्या अभियानामध्ये त्यांचा सहभाग व समर्थन देऊ शकतात.

गेंडा संवर्धन अभियानाविषयी बोलताना रोहीत शर्मा ह्याने म्हंटले, “आपल्या सोबत ह्या ग्रहावर असलेल्या इतर प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे, हे येथील रहिवासी म्हणून आपले कर्तव्य आहे. भविष्य आपल्या हातांमध्येच असते आणि ह्या जगातील समृद्ध जैवविविधतेचा आनंद आपल्या मुलांना घेता येईल, ह्याची खात्री घेण्यासाठी आपल्याला शक्य ते सर्व केले पाहिजे. मला आशा आहे की, ह्या अभियानामुळे इतरांना पुढे येण्याची प्रेरणा मिळेल विशालकाय एकशिंगी गेंड्यांच्या संरक्षणासाठीच्या एनिमल प्लॅनेट, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया आणि माझ्या प्रयत्नांमध्ये ते सहभागी होतील.”

“आपल्या ग्रहाला जे प्राणी विशेष बनवतात त्यांच्या कहाण्या समोर आणण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी डिस्कव्हरी नेहमीच कटिबद्ध राहिलेली आहे. संकटात सापडलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी लोकांच्या शक्तीला दिशा देण्यामध्ये भारतातील आघाडीचे वन्य जीव चॅनल- एनिमल प्लॅनेटच्या सहभागातून आमच्या ब्रँडची क्षमता ह्या उद्देशासाठी देण्यामध्ये आम्ही आधीप्रमाणेच सक्रिय आहोत,” असे डिस्कव्हरीच्या साउथ एशिया- मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा ह्यांनी म्हंटले.

“आम्हांला विश्वास आहे की, गेंड्यांच्या संवर्धनासाठी रोहीतच्या भक्कम सहकार्यामुळे ह्या नाजुक महाकाय प्राण्यांना वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आमच्यासोबत येतील.”

“डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया विशाल एकशिंगी गेंड्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या त्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी आणि संवर्धनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रोहीत शर्माला धन्यवाद देऊ इच्छिते. भारतातील गेंड्यांच्या संवर्धनाच्या अनेक दशकांपूर्वीच्या सफल कहाण्या पुन्हा सांगण्याची गरज आहे आणि आम्हांला विश्वास आहे की, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया आणि एनिमल प्लॅनेटच्या भागीदारीतून राबवण्यात येणा-या #Rohit4Rhinos अभियानामुळेही ह्या प्रजातींच्या संरक्षणामध्ये संवर्धनतज्ज्ञांसमोर असलेल्या आव्हानांना समोर आणण्यास मदत होईल,” असे डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाचे स्पेसीज अँड लँडस्केप्स डायरेक्टर दिपंकर घोसे, ह्यांनी म्हंटले.

भारतातील गेंड्यांविषयी-

भारत आपल्या समृद्ध जैव विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. भारतामध्ये आढळणा-या उल्लेखनीय प्राण्यांमध्ये एक विशालकाय एकशिंगी गेंडा आहे. हे महाकाय प्राणी आता भारतीय नेपाळ- तराई आणि उत्तर पश्चिम बंगाल व आसाममधील छोट्या वस्तीस्थानांपुरते सीमित झाले आहेत. परंतु, एके काळी जो अतिशय भक्कम व प्रबळ प्राणी म्हणून बघितला जात होता, तो आता ‘संकटग्रस्त प्रजातींमध्ये’ येतो. गेंड्याच्या शिंगांमध्ये वैद्यकीय व कामोत्तेजक गुणधर्म असतात असा चुकीचा समज आहे व त्यामुळे जगभरातील ब्लॅक मार्केटसमध्ये ह्या जैव घटकांना अतिशय मोठी मागणी आहे.

गेंड्यांना मारण्यामुळे व त्यांच्या शिकारीमुळे 1990 च्या दशकात भारतातील गेंड्यांची संख्या 200 पेक्षा कमी झाली होती! तसेच गेंडे राहात असलेल्या गवताळ प्रदेशावरील मानवी अतिक्रमणामुळे त्यांची संख्या आणखी कमी झाली. परंतु नंतर अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण व अथक परिश्रमांनी आज भारत व नेपाळमध्ये 3,500 पेक्षा जास्त गेंडे आहेत आणि त्यापैकी 80% गेंडे भारतात आहेत. परंतु ही स्थिती आदर्श नाही आणि वनामधील गेंड्यांची संख्या पूर्ववत होण्यासाठी आणखी खूप काही केले जाण्याची गरज आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

डेव्हिड वॉर्नरला शून्यावर बाद करत ब्रॉडने मोडला अँडरसन, अश्विनचा हा मोठा विक्रम

विराट कोहली, पृथ्वी शॉपेक्षा माझा प्रवास खूप वेगळा आहे…

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, टीम इंडियामधील ‘हा’ खेळाडू सर्वात महत्त्वाचा

Loading...
You might also like
Loading...