बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेला गेल्या आठवड्यात पर्थमध्ये सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत विजय मिळवला. तसेच मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये होणार आहे. जो दिवस-रात्र असेल. या कारणास्तव, भारतीय संघ कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध गुलाबी चेंडूने दोन दिवसीय सराव सामना खेळत आहे. मात्र, या सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाहून गेल्याने नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र आता दुसऱ्या दिवशी हवामान सहकार्य करत असून दोन्ही संघ 50-50 षटकांचा सामना खेळत आहेत. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध नाणेफेक झाल्यानंतर लगेचच भारताच्या संघाचे पत्रक चर्चेचा विषय बनले. त्यानंतर हे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. कारण कर्णधार रोहित शर्माचे नाव पहिल्या दोन स्थानांवर नसल्याने हे घडले. सांघिक यादीत त्याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. त्यामुळेच रोहित सलामी तर देणार नाही अशी चर्चा आहे. टीम इंडियाच्या सराव सामन्यांच्या यादीत यशस्वी जयस्वालचे नाव आघाडीवर आहे, त्यानंतर केएल राहुलचे नाव आहे. या दोघांनी पर्थमध्ये सलामी दिली आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली होती.
🚨 Team India’s team sheet for the warm-up match.
Rohit Sharma’s name at No 5???
Did everything change after just one match??? If yes then it’s going to be a mess. pic.twitter.com/BujeTFa2JL
— Vishal. (@SPORTYVISHAL) December 1, 2024
सलामीवीर म्हणून राहुल चांगलाच प्रभावी ठरला होता. या कारणास्तव रोहितने डावाची सुरुवात करू नये आणि राहुलला वरच्या क्रमाने खेळत राहण्याची परवानगी द्यावी. असे काही तज्ज्ञांचे मत आहे. आता सराव सामन्यात रोहित पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार की डावाची सुरुवात करणार हे पाहणे रंजक राहील.
पहिल्या सामन्यात रोहित शर्मा पर्थ कसोटीसाठी उपलब्ध नव्हता. त्याची पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा आई झाली आहे आणि त्यामुळेच रोहितने तिच्यासोबत काही काळ घालवण्याचा निर्णय घेतला होता. या कारणामुळे तो पहिल्या कसोटीदरम्यान टीम इंडियात सामील झाला होता.
हेही वाचा-
मार्को जॅन्सनने 11 विकेट्स घेत रचला इतिहास, भारतीय गोलंदाजाचा 28 वर्ष जुना विक्रम मोडित!
गुलाबी चेंडूच्या सामन्यात रोहित शर्माची आकडेवारी फारच खराब, दुसऱ्या कसोटीत हिटमॅनची परिक्षा!
जो रूटने मोडला सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम, आता या बाबतीत अव्वल स्थानी