ऑस्ट्रेलियात आठव्या टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीला सुरुवात झाली आहे. मुख्य फेरीचा दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना खेळला जाईल. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर हा सामना खेळला जाणार आहे. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या भारतीय संघाने खूप आधीच ऑस्ट्रेलियामध्ये येत येथील परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला होता. आता याच मुद्द्यावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने महत्वाचे वक्तव्य केले आहे.
आपल्या सलामीच्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माने अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. जवळपास 15 दिवस आधी ऑस्ट्रेलियात पोहोचण्याचे कारण विचारले असता रोहित म्हणाला,
“जेव्हा तुम्ही मोठ्या दौऱ्यावर जात असता तेव्हा तुम्हाला अधिक तयारीची गरज असते. संघातील बरेच खेळाडू या परिस्थितीशी अनुरूप नव्हते. बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाचा हा चांगला निर्णय होता. आम्हाला आमच्या क्षमता पारखण्याचा मौका यामुळे मिळाला. त्यामुळेच आम्ही येथे लवकर पोहोचलो होतो.”
भारतीय संघाने 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाची वाट धरली होती. त्यानंतर भारतीय संघाने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाशी दोन सराव सामने खेळले होते. तसेच विश्वचषकाआधी भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळायचे होते. मात्र, यातील न्यूझीलंडविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाला होता. मात्र, 16 दिवस आधी येथे पोहोचल्याने भारतीय संघ परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊ शकला.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितचे स्पष्टीकरण! सांगितले, टीम इंडिया 2021च्या टी20 विश्वचषकापासून कशी चेंज झाली
डेविड वॉर्नर लवकरच होणार निवृत्त! ‘या’ विश्वचषकापर्यंत खेळण्याचा असेल प्रयत्न