ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंड संघाचा पहिला डाव १८३ धावांवर संपुष्टात आणला होता. त्यानंतर फलंदाजी करताना भारतीय संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु, पुन्हा एकदा रोहित शर्माला चांगली सुरुवात मिळून तो मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला आहे. चला तर पाहूया रोहित शर्माची इंग्लंडमधील कामगिरी.
वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये जगातील प्रत्येक मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहित शर्माला मात्र कसोटी क्रिकेटमध्ये, परदेशात साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने भारताबाहेर आतापर्यंत एकूण ४० डावात २७.२५ च्या सरासरीने १०४५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ६ अर्धशतक झळकावले आहेत. तर भारतात त्याने १६७० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ७ शतक आणि ६ अर्धशतक झळकावले आहेत.(Rohit sharma poor form continues on foreign pitches, see figures)
इंग्लंडमध्ये रोहित शर्माची कामगिरी
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना २०२१- (३३ धावा )
भारत विरुद्ध न्यूझीलंड, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना -(३० धावा)
भारत विरुद्ध न्यूझीलंड,विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना- (३४ धावा )
भारत विरुद्ध इंग्लंड, २०१४ – (२८ आणि ६ धावा)
रोहित शर्माची २०१८ पासून परदेशातील कामगिरी ( इंग्लंड व्यतिरिक्त)
ऑस्ट्रेलिया,२०२१- ( ४४ आणि ७ धावा)
ऑस्ट्रेलिया,२०२१- ( २६ आणि ५२ धावा)
ऑस्ट्रेलिया,२०२१ -( ६३ आणि ५ धावा)
ऑस्ट्रेलिया ,२०२१-( ३७ आणि १ धावा)
दक्षिण आफ्रिका ,२०१८ -( १० आणि ४७ धावा)
दक्षिण आफ्रिका, २०१८ -( ११ आणि १० धावा)
वेस्टइंडिज, २०१८ – (९ आणि ४१ धावा)
रोहित शर्माने परदेशातील कामगिरीत सुधारणा केली नाही तर, त्याचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. कारण केएल राहुल चांगली फलंदाजी करत आहे. तर सलामी फलंदाजी करण्यासाठी मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ हे दोन पर्याय भारतीय संघासमोर उपलब्ध आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-ENG vs IND, 1st Test, 3rd Day: रॉबिन्सनच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद, भारताच्या ५ बाद १४५ धावा
-खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी
-अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे