भारतीय क्रिकेट संघ डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी व ३ वनडे सामने खेळणार आहे. २६ डिसेंबरपासून हा दौरा सुरु होत असून २३ जानेवारी रोजी संघ शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. एक महिन्याच्या या दौऱ्यात रोहित शर्मा याच्यावर फलंदाज, कर्णधार, उपकर्णधार अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. याचसाठी रोहितने कसून सराव सुरू केला आहे. याचमुळे दक्षिण आफ्रिका संघाचे टेन्शन नक्कीच वाढले असणार, यात शंका नाही. (India Tour of South Africa)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ८ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली. यात कसोटी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे कायम ठेवत रोहित शर्माकडे कसोटी संघाचे उपकर्णधारपद दिले. यापुर्वी उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे होते. तसेच यावेळी वनडे कर्णधारपदावरुन विराटला हटवत बीसीसीआयने पुर्णवेळ रोहितकडे कर्णधारपद दिले. त्यामुळे रोहितकडे कसोटीचे उपकर्णधारपद, वनडे व टी२० संघांचे कर्णधारपद आले आहे. एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या आल्यामुळे रोहितने कसून सरावाला सुरुवात केली आहे.
रोहितने ११ डिसेंबर रोजी तो सराव करत असल्याचा एक छान व्हिडीओचं इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याला जवळपास ५.३ मिलीयन अर्थात ५३ लाख लोकांनी पाहिला आहे. (Rohit Sharma Instagram) रोहित या व्हिडीओला हटके कॅप्शनही दिले आहे. ‘१…२….३…सुरुवात करतोय,’ असं तो या कॅप्शनमधे म्हणतोय.
यावेळी रोहित थ्रोडाऊनवर फलंदाजी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ नक्की कुठचा आहे याबद्दल माहिती नाही. परंतू रोहित जेव्हा घरी असल्यावर सराव करतो तेव्हा तो वानखेडे स्टेडियम, बीकेसी किंवा सीसीएसच्या मैदानावर सराव करतो. (Rohit Sharma Practicing In Nets)
https://www.instagram.com/p/CXTFDedhFFz/
रोहितने शेअर केलेल्या व्हिडीओपाठोपाठ १२ डिसेंबर रोजी बीसीसीआयनेही रोहितच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहितची कदाचीत ही पहिलीच मुलाखत असू शकते. यात रोहितने संघ भावनेला महत्त्व दिले आहे. तसेच लोकं काय म्हणतात याकडे लक्ष देत नसल्याचेही तो सांगायला विसरला नाही. बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून त्याला ३ हजार लोकांनी रिट्विट केले आहे तर २ लाख २२ हजार लोकांनी ट्विटरवर पाहिले आहे.
🗣️🗣️ "The pressure will always be there. As a cricketer, it is important to focus on my job."
SPECIAL – @ImRo45's first interview after being named #TeamIndia’s white-ball captain coming up on https://t.co/Z3MPyesSeZ. 📽️
Stay tuned for this feature ⌛ pic.twitter.com/CPB0ITOBrv
— BCCI (@BCCI) December 12, 2021
चाहत्यांना रोहितकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मोठ्या अपेक्षा आहेत. यामुळे रोहितच्या इंस्टाग्राम पोस्टवर जोरदार कमेंट्स येत आहे. त्यात त्याने त्रिशतक करावे असंही काही चाहत्यांच म्हणणं आहे. काही चाहत्यांनी त्याचे वनडे कर्णधार झाल्याबद्दल अभिनंदनही केले आहे. मुंबई इंडियन्स संघानेही रोहितच्या या इंस्टा पोस्टवर कमेंट करत सराव ह ताकदीचा इमोजी वापरला आहे. ‘रोहितने मारलेला पुल शॉट खरंच अवघड आहे,’ असंही एक चाहता म्हणत आहे. कर्णधार व फलंदाज म्हणून रोहित विराटपेक्षा भारी असल्याचे एका चाहत्याचे म्हणणे आहे.
३४ वर्षीय रोहितने भारताकडून ४३ कसोटी, २२७ वनडे व ११९ टी२० सामने खेळले आहेत. रोहित गेल्या १-२ वर्षात कसोटी संघात चांगलाच स्थिरावला आहे. २००७ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला हा खेळाडू भारतीय संघातील एक सिनीयर खेळाडू म्हणून ओळखला जातो. संघाला चांगली सुरुवात करुन देण्यात एक मोठा खेळाडू म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असणार हे नक्की.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडिया १६ डिसेंबरला होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना, ‘इतके’ दिवस राहणार बायो-बबलमध्ये
‘त्या’ दौऱ्यानंतर पूर्णपणे खचून गेला होता विराट, रवी शास्त्रींचा उलगडा
एक फ्लॉप कामगिरी अन् कारकिर्दीला फुलस्टॉप, दक्षिण आफ्रिका दौरा ‘या’ खेळाडूसाठी ठरू शकतो शेवटचा