मुंबई । प्रत्येक व्यक्तीचा जीवनात त्याची प्रथम कमाई नेहमी महत्वाची असते, जी त्याला आठवते. काहीजण प्रथम कमाई आईकडे देतात तर काही देवळात देणगी देतात. काही जण गोरगरीबांमध्ये वाटतात तर काहीजण पार्टी करतात. प्रत्येकाचा विश्वास आणि जीवनशैली वेगळी आहे. नुकतेच भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने आपल्या ट्विटर अकाऊंटवर घेण्यात आलेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात आपल्या पहिल्या पगाराची रक्कम आणि तो कसा मिळवला याची माहिती दिली.
”तुझा पहिला पगार किती होता आणि तुला कोणत्या वयात मिळाला? मित्र किंवा कुटूंबासह आपण हे कसे खर्च केले,”असे एका युजरने त्याला ट्विटरवर विचारले. रोहितने उत्तर दिले की, “माझी पहिली कमाई प्रत्यक्षात पगार नव्हती तर सोसायटीच्या जवळ काही स्थानिक सामना खेळताना विजयी झाल्यावर 50 रुपये रोख मिळाले होते.”
उजव्या हाताने फलंदाजी करणारा रोहित म्हणाला, ”माझा पहिला पगार 50 रुपये होते. जे मी माझ्या मित्रांसह वडा पाव खाऊन खर्च केला.”
Q: #askRo How much was your first paycheck worth and at what age did you get it? How did you spend it, with friends or family?
– @dhruvy21— Rohit Sharma (@ImRo45) August 2, 2020
30 वर्षीय रोहित आज कोट्यावधी रुपये कमावतो. एकट्या बीसीसीआय कडूनच दरवर्षी 7 कोटी रुपये त्याला मिळतात. त्याने क्रिकेट जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजींपैकी एक म्हणून स्वत: ला स्थापित केले आहे. रोहित लवकरच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईचा हा फलंदाज अखेर जानेवारीत भारताकडून खेळला होता. रोहित न्यूझीलंडविरुद्ध टी 20 मालिकेमध्ये खेळताना दिसला होता. त्याने 41 चेंडूत 60 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला, त्यानंतर त्याच्या पायाच्या पिंडरीला दुखापत झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून सोशल मीडियावर विराट कोहलीची केली जात आहे चेष्टा
हा भारतीय खेळाडू असा आहे, ज्याची चर्चा राष्ट्रपती- पंतप्रधान करतात
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप
अवघे १९ वय असताना वनडे क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा आकीब जावेद
आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर