---Advertisement---

रोहित शर्माच्या २६४ धावांच्या खेळी नंतरही ‘ते’ होते नाखूश

On: शनिवार, नोव्हेंबर 13, 2021 9:00 AM
Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय वनडे आणि टी-20 संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी 13 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. या दिवशी रोहित शर्माने तो डाव खेळला, ज्यानंतर त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज मानले गेले. ज्या डावाचा लोक विचार करू शकत नव्हते, असा खेळ रोहित शर्माने वास्तवात खेळून दाखवला होता. 2014 साली श्रीलंकेविरूद्ध कोलकाता येथे झालेल्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 264 धावा फटकावल्या होत्या.

33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने रोहित शर्माने 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळण्याचा विक्रम केला होता. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतीय संघाने हा सामना 153 धावांनी जिंकला आणि प्रतिस्पर्धी श्रीलंका संघ रोहित शर्माची वैयक्तिक धावसंख्यादेखील पार करू शकला नाही. रोहित शर्माने या खेळीने अनेक विक्रम मोडले.

रोहित शर्मा म्हणाला- डंकन फ्लेचर 264 धावांनीही नव्हते समाधानी

रोहित शर्मा जेव्हा 264 धावा करुन ड्रेसिंग रूममध्ये परतला तेव्हा भारतीय संघाचे तेव्हाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर थोडे निराश झाले होते. रोहित शर्मा म्हणाला, “डंकन फ्लेचरने मला सांगितले – तू 300 धावा फटकावू शकला असता, तु सुरुवातीला हळू खेळलास.”

रोहित शर्माने त्या मुलाखतीतही सांगितले होते की त्या सामन्याआधी तो बर्‍यापैकी चिंताग्रस्त होता. रोहित म्हणाला, ‘बोटाच्या दुखापतीनंतर मी संघात परतत होतो. मी जरा चिंताग्रस्त होतो आणि मी याबद्दल पत्नी रितिकाशीही बोललो होतो.’

रोहित शर्माने मुलाखतीत सांगितले होते की तो जिथेही जाईल तिथे प्रत्येकजण त्याला विचारतो की 300 धावांची खेळी कधी खेळणार ? रोहित शर्मा म्हणाला, ‘जेव्हा मी मैदानात, विमानतळावर जातो तेव्हा प्रत्येकजण विचारतो की तू 300 धावा कधी करणारेस? हे खूप कठीण आहे, परंतु मी 300 बनविण्याचा प्रयत्न करेन.’

रोहित शर्माला मिळाले होते जीवनदान

कोलकाता येथे झालेल्या त्या सामन्यात रोहित शर्माला थिसारा परेराने अवघ्या 4 धावांवर असताना जीवनदान दिले होते. तिसर्‍या स्लिपमध्ये परेराने रोहित शर्माचा झेल सोडला होता. हा झेल सुटल्यानंतर मात्र रोहित शर्माने श्रीलंकेला जबरदस्त तडाखा दिला होता . रोहित शर्माने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पण त्यानंतरच्या 73 चेंडूत त्याने 164 धावा ठोकल्या. रोहित शर्माचा स्ट्राइक रेट 150 पेक्षा जास्त होता. आश्चर्यकारक गोष्ट अशी की रोहित शर्माचे हे दुसरे दुहेरी शतक होते आणि हा पराक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला होता. यानंतर रोहित शर्माने 2017 मध्ये वनडेमध्ये तिसरे द्विशतकही झळकावले.

महत्त्वाच्या बातम्या –

…तेव्हा एमएस धोनीने केलेली ‘ती’ भविष्यवाणी रोहित शर्माने खरी करून दाखवली!

…आणि हिटमॅन रोहित शर्मा झाला ‘स्टार क्रिकेटर’

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---