Loading...

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने शेअर केला खास फोटो, एक तासातच आल्या १ लाख लाईक्स

रविवारी (19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियम (M Chinnaswamy Stadium), बेंगळुरु (Bangalore) येथे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) अंतिम सामन्यात 7 विकेट्सने विजय (Won by 7 Wickets) मिळवला. तसेच मालिका 2-1ने खिशात घातली. या मालिकेनंतर आता भारतासमोर न्यूझीलंड दौऱ्याचे एक मोठे आव्हान आहे.

न्यूझीलंड (New Zealand) मालिकेपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) सोमवारी (20 जानेवारी) इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये रोहितबरोबर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant), वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami), फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि यु़जवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) दिसत आहेत.

View this post on Instagram

Ready for New Zealand

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

Loading...

रोहितने फोटो शेअर करत लिहिले की, “न्यूझीलंड दौऱ्यासाठी तयार आहोत.” रोहितने शेअर केलेल्या या फोटोला 10 मिनिटाच्या आत 1 लाख लोकांनी लाईक केले होते.

रोहितबरोबरच चहलनेही एक फोटो शेअर केला आहे. चहलने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहित, पंत आणि कुलदीप दिसत आहेत. या फोटोमध्ये त्याने लिहिले की,  “ऑकलँडसाठी रवाना.”

View this post on Instagram

Off to Auckland ✈️🇮🇳

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23) on

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 आंतरराष्ट्रीय टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये 24 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे.

Loading...

आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ- 

विराट कोहली (VIrat Kohli) (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल (KL Rahul), शिखर धवन (Shikhar Dhawan), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), मनीष पांडे (Manish Pandey), रिषभ पंत, शिवम दुबे (Shivam Dube), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी, नवदीप सैनी (Navdeep Saini), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur).

आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेसाठी असे आहे वेळापत्रक-
आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील पहिला सामना ईडन पार्क (Eden Park), ऑकलँड (Auckland) येथे खेळला जाईल. दुसरा टी20 सामना 26 जानेवारीला याच मैदानावर होईल. तिसरा टी20 सामना 29 जानेवारीला हॅमिल्टन (Hamilton) येथे खेळला जाईल. 31 जानेवारीला चौथा टी20 सामना वेलिंग्टन (Wellington) येथे आणि मालिकेचा पाचवा आणि अंतिम टी20 सामना 2 फेब्रुवारीला माउंगानुइ (Maunganui) येथे खेळला जाईल.

You might also like
Loading...