भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. हे सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येत आहेत. मंगळवारी (२३ मार्च) झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. यासह भारतीय संघाने या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात सलामीला आलेला फलंदाज रोहित शर्मा याला फलंदाजी करताना चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. यानंतर आता रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा मैदानात आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसाच तो आपल्या मजेशीर स्वभावासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने नुकताच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा त्याला मधले बोट दाखवताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत.
रिषभने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित कोविड चाचणी करून मजेशीर मूडमध्ये चालत येताना दिसत आहे. त्यावेळी रिषभ त्याला विचारतोय, “कैसे हो भैया?” यावर प्रतिक्रिया देत रोहितने मस्करी करत रिषभला हाताचे मधले बोट दाखवले आहे. त्यानंतर दोघेही हसू लागले.
— tony (@tony49901400) March 24, 2021
पहिल्या सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवण्यानंतर, येत्या २६ मार्च रोजी या मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघासमोर हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचे आव्हान असणार आहे. तर इंग्लंड संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असेल. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात अवघ्या २८ धावांची खेळी केली होती. यामुळे भारतीय संघाला पुढील सामन्यात रोहित शर्माकडून मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तयार राहा हाय व्होल्टेज सामने पाहण्यासाठी; लवकरच होऊ शकते भारत विरुद्ध पाकिस्तान मालिका
माजी भारतीय खेळाडू म्हणतो, ‘या’ मुंबईकर खेळाडूला मिळायला हवी होती भारतीय संघात संधी, पण…