भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारपासून (१२ मार्च) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (Second Test Match) सुरू झाला आहे. हा सामना दिवस-रात्र (Day-Night Test) स्वरुपात खेळवला जात आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आहे. मात्र भारतीय संघाने पहिल्या १० षटकांमध्ये त्यांच्या २ महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आहेत. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यामुळे मोठा अपघात घडला आहे.
तर झाले असे की, पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे या सामन्यातही रोहित आणि मयंक अगरवालची जोडी सलामीला फलंदाजीसाठी आली होती. मात्र डावातील दुसऱ्या षटकातच मयंक अविष्का फर्नांडोच्या नो बॉलवर धावबाद झाला. मयंकची विकेट गेल्यानंतर हनुमा विहारीसोबत मिळून रोहित संघाचा डाव पुढे नेत होता. त्याने त्याच्या बचावात्मक खेळीदरम्यान एक अप्रतिम षटकार मारला. डावातील सहाव्या षटकातील शेवटच्या सहाव्या चेंडूवर रोहितने डिप मिड विकेटच्या दिशेने हा खणखणीत षटकार खेचला होता. हा त्याच्या संपूर्ण खेळीतील एकमेव षटकार (Rohit Sharma’s Six) ठरला.
IND vs SL 2022, 2nd Test, Day 1: Rohit Sharma Six https://t.co/L1iDxsyDrB
— Mohammad Salik (@MS150kmph) March 12, 2022
परंतु त्याच्या या षटकाराने सामना पाहण्यासाठी आलेल्या दर्शकाचे मात्र मोठे (Rohit Sharma Hit Spectator’s Nose) नुकसान केले. रोहितने डिप मिड विकेटला मारलेल्या षटकाराचा चेंडू तिथे असलेल्या दर्शकाच्या नाकावर जाऊन लागला. आणि तो चेंडू इतक्या जोराने लागला की, प्रथमोपचार केल्यानंतरही त्या दर्शकाच्या नाकातून रक्त वाहायचे थांबले नाही. परिणामी नंतर त्याला बंगळुरूतील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्या नाकाचा एक्स-रे काढण्यात येईल. या डावात रोहित फक्त १५ धावा करून झेलबाद झाला.
https://twitter.com/CricCrazyJ0hns/status/1502583322915966978?s=20&t=zwT-9RJeO7WCj0MbjflJ4g
यापूर्वीही फलंदाजाच्या षटकारामुळे दर्शक झालाय जखमी
यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये एका आयपीएल सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या षटकारामुळेही दर्शक जखमी झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पुणे वॉरियर्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. ख्रिस गेलने राहुल शर्माच्या गोलंदाजीवर मिड विकेटवर खणखणीत षटकार मारला होता. त्यावेळी तिथे बसलेल्या महिला दर्शकाच्या नाकावर हा चेंडू आदळला होता. ज्यामुळे तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, गेलला ही बाब समजल्यानंतर तो त्या महिला दर्शकेची विचारपूस करण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी रुग्णालयातही गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय