Loading...

रोहित शर्माने केला चहलचा तो फोटो व्हायरल, लोकांनी उडवली खिल्ली

रविवारी(19 जानेवारी) भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या वनडे सामन्यात 7 विकेट्सने पराभूत करत 3 सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर सोमवारी रोहित शर्माने भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर द रॉक यांचा एक फोटो शेअर केला आहे.

रोहितने शेअर केलेला द रॉक आणि चहलचा हा फोटो कोलाज केलेला असून त्यांचा हा शर्टलेस फोटो आहे. तसेच दोघांच्याही शरिरावर टॅट्यू आहेत. या फोटोला रोहितने कॅप्शन दिले आहे की ‘आज मी सर्वात्तम फोटो पाहिला. भारताने मालिका जिंकली पण चर्चेत मात्र दुसरे कोणीतरीच राहिले.’

रोहितच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी चहलची खिल्ली देखील उडवली आहे. तसेच काही चाहत्यांनी चहल आणि रोहितचा एक जूना व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये चहलने ‘द रॉक’चा उल्लेख केला होता.

झाले असे की 2017मध्ये बीसीसीआयने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात दिसते की रोहितने चहलला प्रश्न विचारला की एका व्यक्तीचा मोबाईल नंबर तुला तुझ्या मोबाइलमध्ये हवा आहे की ज्यामुळे तू त्या व्यक्तीशी केव्हाही बोलू शकशील, तर तू कोणाचा नंबर घेशील. यावर चहलने उत्तर देताना ‘दा रोक’ असे शब्द उच्चारले होते.

Loading...

त्यावेळी रोहितला पटकन समजले नाही पण नंतर त्याला जेव्हा कळाले की चहल ‘द रॉक’ म्हणत आहे, त्यावेळी त्याला त्याचे हसू आवरता आले नव्हते. या व्हिडिओचीही काही चाहत्यांनी आठवण करुन दिली आहे.

रोहितने सोमवारी शेअर केलेला हा फोटो चहलनेही रिट्विट केला असून त्याने ‘द रॉक’ असे कॅप्शन दिले आहे.

Loading...

द रॉक हे डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर ड्वेन जॉन्सनचे टोपननाव आहे. त्याने अनेक हॉलीवूड चित्रपटांमध्ये कामही केले आहे.

रोहित आणि चहल या दोघांमध्ये मैदानाबाहेरही चांगली मैत्री आहे. त्यामुळे रोहितने याआधीही अनेकदा चहलला ट्रोल केले आहे. तसेच अनेकदा चहलही रोहितला ट्रोल करत असतो.

असे केले चाहत्यांनी चहलला ट्रोल – 

Loading...

 

Loading...

You might also like
Loading...