---Advertisement---

कपिल देव-धोनीचाही विक्रम मोडीत, रोहित शर्मा ठरला ‘सर्वात यशस्वी’ कर्णधार!

---Advertisement---

यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जे चमत्कार माजी भारतीय कर्णधार कपिल देव, माजी पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान, माजी श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी करू शकले नाहीत, ते रोहित शर्माने केले. रोहित शर्मा आपल्या देशासाठी सलग दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार बनला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा टी20 विश्वचषक आणि आता 2025चा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आहे. (Rohit Sharma ICC trophies record)

जगात फक्त चार कर्णधार असे आहेत ज्यांनी सलग दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यापैकी रोहित हा एकमेव आशियाई कर्णधार आहे. (Rohit Sharma Won back-to-back ICC titles) आशियातील अनेक कर्णधारांनी आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत, परंतु कोणीही सलग दोन आयसीसी स्पर्धा जिंकलेल्या नाहीत. एमएस धोनीनेही तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत, पण तोही देशासाठी सलग दोन आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. रोहित शर्माच्या आधी, पॅट कमिन्सने 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि वर्ल्ड कप जिंकला होता.

याशिवाय, रिकी पॉन्टिंगने 2006चा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2007चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. 1975 आणि 1979 मध्ये क्लाइव्ह लॉईड यांनी पहिल्यांदाच सलग दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या. ज्याने वेस्ट इंडिजला दोन विश्वचषक जिंकून दिले. मात्र, सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला चार जेतेपदे मिळवून दिली, ज्यात दोन चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन एकदिवसीय विश्वचषक यांचा समावेश आहे. या बाबतीत, एमएस धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

धोनीने टी20 आणि एकदिवसीय विश्वचषकाव्यतिरिक्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. पॉन्टिंगने 2003 आणि 2007 चे एकदिवसीय विश्वचषक आणि 2006 आणि 2009चे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---