भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीमध्ये रोहित शर्माने रिव्हरसाईड मैदानावर सुरू असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात नाणेफेक जिंकून काउंटी इलेव्हनविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्मा सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरला. काउंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्ध रोहितकडून भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा होती. परंतु त्याने 33 चेंडू मध्ये फक्त 9 धावा काढल्या. यात दुर्दैवी बाब म्हणजे रोहित बाद झाला तो त्याचा आवडता पुल शॉट खेळून. लिंडन जेम्सच्या गोलंदाजीवर जैक कार्लसनने रोहितचा उत्कृष्ट असा झेल पकडला.
खरे तर 10 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर रोहितने संधी निर्माण केली होती आणि जबरदस्त शॉट मारला होता. पण चेंडू हवेत उंच गेला. यावेळी कार्लसनचे कौतुक करावे तितके कमी पडले. कारण त्याने उलट बाजूने धावत जात हवेत लांब उडी मारली आणि रोहितचा झेल घेतला होता. कारण असा झेल पकडणे सोपी गोष्ट नाही.
https://twitter.com/Mohali_Monster/status/1417435880130711553
भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेची तयारी लक्षात घेता भारत काउंटी सिलेक्ट इलेव्हन विरुद्ध मंगवारपासून (२० जुलै) सराव सामना खेळत आहे.
या सामन्यात रोहितने नियमित कर्णधार विराट कोहलीच्या जागी कर्णधारपदाची सूत्रे घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी शुभमन गिल जखमी झाला होता आणि त्याच्या जागी या सामन्यासाठी सलामीच्या वेळी मयंक अगरवालला संधी देण्यात आली आहे.
रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा हे दोघेही उपलब्ध नसल्याने केएल राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सामन्यात भारताचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर रविचंद्रन अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे.
सराव सामन्यासाठी दोन्ही संघ
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, केएल राहुल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
काउंटी सिलेक्ट संघ: रॉबर्ट येट्स, हसीब हमीद, जेम्स रेव, वॉशिंग्टन सुंदर, विल रोड्स (कर्णधार), जॅक लिब्बी, क्रेग माईल्स, लियाम पॅटरसन-व्हाइट, लिंडन जेम्स, जॅक कार्सन, आवेश खान.
महत्त्वाच्या बातम्या –
फलंदाजाला फसवायचंय? मग चाहरकडून शिका! दीपकने उडवल्या लंकन फलंदाजाच्या दांड्या; व्हिडिओ व्हायरल
शुबमन गिलनंतर आता भारताचा ‘हा’ खेळाडूही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून होणार बाहेर?
मोठी बातमी! ऑलिंपिक २०३२ चे आयोजन होणार ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ शहरात, आयओसीची घोषणा