सध्या इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर ऐतिहासिक सामना खेळवला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडच्या संघात या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एक मजेशीर फोटो समोर आला होता. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधून दुर्बिणीद्वारे सामना पाहत असल्याचा हा फोटो होता. आता यावर रोहितची पत्नी रितिकाने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्माचा फोटो व्हायरल
या अंतिम सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. या डावात रोहित शर्मा ३४ धावा करून बाद झाला. मात्र बाद झाल्यानंतर तो चर्चेत आला. बाद होऊन ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर तो दुर्बिणीच्या साहाय्याने अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीच्या फलंदाजीचा आनंद घेतांना दिसून आला. हा फोटो त्यानंतर सोशल मिडीयावर व्हायरल झाला. चाहत्यांनी त्यावर मजेशीर कमेंट देखील केल्या.
पत्नी रितिकाने दिली प्रतिक्रिया
रोहितच्या या फोटोवर चाहत्यांनी तर प्रतिक्रिया दिल्याच. मात्र पत्नी रितिकाने देखील भन्नाट कमेंट केली. रितिकाने रोहितचा हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. आणि यावर प्रतिक्रिया देतांना तिने लिहिले की, ‘हा सामना पाहण्याचा प्रयत्न केला जातो आहे की आमच्यावर हेरगिरी करण्याचा प्रयत्न?’ रितिकाच्या या मजेशीर प्रतिक्रियेने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पहिल्या डावात भारताची हाराकिरी
दरम्यान, या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजी कोसळली. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या २१७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा तर कर्णधार विराट कोहलीने ४४ धावा केल्या. तर न्यूझीलंड कडून वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने ३१ धावांत ५ बळी घेतले. त्याला ट्रेंट बोल्ट आणि नील वॅगनरने प्रत्येकी २ बळी घेत सुयोग्य साथ दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
तब्बल १५ वर्षानंतर या देशात भारतीय महिला खेळणार कसोटी, क्रिकेट बोर्डाने दिली या गोष्टीची शाश्वती
जेमिसनच्या ‘पंच’ने भारत घायाळ, किवी गोलंदाजाने नावे केला ‘हा’ विक्रम
भारतीय संघाने केलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळे लायनवर जळतो रॉस टेलर