आयपीएलच्या आगामी हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे युएई मध्ये या स्पर्धेचा तेरावा हंगाम पार पडला होता. मात्र आता चौदावा हंगाम पुन्हा एकदा भारतात परतला आहे. या हंगामासाठी सगळ्याच संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
गतविजेता संघ असलेला मुंबई इंडियन्स देखील यात मागे नाही. पाच वेळा आत्तापर्यंत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबईचे यंदाही ते विजेतेपद कायम राखण्याचे लक्ष्य असेल. मात्र आता हंगामाला काही दिवस बाकी असतांना त्यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने केरळच्या एका खेळाडूला रिझर्व्ह खेळाडू म्हणून आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले आहे.
अखेरच्या क्षणी घेतला निर्णय
मुंबई इंडियन्सने आयपीएल सुरु व्हायला केवळ दोन आठवडे बाकी असतांनाच हा निर्णय घेतला आहे. त्यांनी केरळचा फलंदाज रोजित गणेश याची संघात रिझर्व्ह खेळाडू म्हणून निवड केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटचा अतिशय कमी अनुभव असलेल्या या खेळाडूला मुंबईने संघात सामील केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोण आहे रोजित गणेश?
केरळचा २७ वर्षीय रोजित गणेशने मागील महिन्यातच विजय हजारे ट्रॉफीत खेळतांना आपले प्रथम श्रेणी पदार्पण केले होते. या विजय हजारे ट्रॉफीत त्याने केवळ दोन सामने खेळले होते. यातील पदार्पणाच्या उत्तर प्रदेशविरूद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ६ धावा काढल्या होत्या. तर रेल्वे विरुद्ध खेळलेल्या दुसर्या सामन्यात तो ४ धावा काढून बाद झाला होता.
रोजित फलंदाजी शिवाय पार्टटाईम लेगस्पिन गोलंदाजी देखील करतो. उत्तर प्रदेशविरूद्धच्या सामन्यात त्याने २ षटके गोलंदाजी केली होती.
रोजित गणेशने अद्याप एकही टी२० सामना खेळलेला नसून त्याने रणजी करंडकात देखील पदार्पण केलेले नाहिये. मात्र केरळा प्रेसिडेंट कप टी२० स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली. याच जोरावर त्याने मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले असावे.
महत्वाच्या बातम्या:
स्वत:चा खर्च स्वत: ते बबल टू बबल सुविधा, वाचा आयपीएलचे १० नवे नियम; खेळाडूंसह कुटुंबालाही बंधनकारक
झक्कास! हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने लावले ब्लॅक स्विम सूटमध्ये ठुमके, पाहा व्हिडिओ