fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

प्रेक्षकांविना फ्रेंच ओपन घेण्याबद्दल फ्रेंच टेनिस असोशियनचे प्रमुख म्हणाले…

roland-garros-could-be-behind-closed-doors-says-french-tennis-boss

फ्रांन्स टेनिस महासंघाचे प्रमुख बर्नार्ड गुइडिसेली (Bernard Guidicelli) यांनी रविवारी फ्रेंच ओपनचे आयोजन प्रेक्षकांविना करण्याचे सुतोवाच केले आहे. कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमुळे फ्रेंच ओपन अर्थात रोला गारो ४ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

या स्पर्धेचा अंतिम सामना प्रथेप्रमाणे जुनच्या पहिल्या रविवारी असतो.

गुइडिसेली म्हणाले की, आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. २४ मे रोजी सुरु होणारी स्पर्धा २० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात कोणतेही दुख नाही. सध्या आम्ही कोणतेच पर्याय नाकारले नाहीत. ही स्पर्धा नक्की होणार व प्रेक्षक ती नक्की टिव्हीवर पाहणार.

प्रेक्षकांविना स्पर्धा जरी घेतली तरी टिव्हीवरील प्रसारणामुळे एक व्यावसायिक भाग नक्की जपला जाईल, असेही ते म्हणाले

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व टेनिस स्पर्धा मार्च महिन्यापासून १३ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

You might also like