लंडन। बुधवारपासून (२ जून) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून सलामीवीर रॉरी बर्न्सने शतकी खेळी केली आहे. त्याच्या या शतकामुळे इंग्लंडला पहिल्या डावात सर्वबाद २७५ धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना १०३ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. कारण न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३७८ धावा केल्या होत्या.
बर्न्सने इंग्लंडला अडचणीतून काढले बाहेर
सलामीला फलंदाजीला आलेला बर्न्स सुरुवातीपासून चांगला खेळत होता. मात्र, इंग्लंडने १८ धावांत २ विकेट्स गमावल्याने दबाव वाढला होता. यावेळी त्याने कर्णधार जो रुटला साथीला घेतले आणि ९३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. रुट ४२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर ऑली पोप २२ धावा करुन बाद झाला. तर लॉरेन्स आणि जेम्स ब्रॅसी शुन्यावर बाद झाले.
एका बाजूने या विकेट्स जात असताना बर्न्सने दुसरी बाजू सांभाळली होती. अखेर ७ व्या विकेटसाठी त्याला ऑली रॉबिन्सनची साथ मिळाली. या दोघांनी ६३ धावांची भागीदारी केली. रॉबिन्सन ४२ धावा करुन बाद झाला. अखेर बर्न्सने जेम्स अँडरसनसह ५२ धावांची भागीदारी केली. पण बर्न्स इंग्लंडच्या १० विकेटच्या रुपात अखेर १०२ व्या षटकात टीम साऊथी विरुद्ध बाद झाला. त्याने ४७७ मिनिटे खेळपट्टीवर घालवताना २९७ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकारासह १३२ धावा केल्या.
ड्रेसिंग रुममध्ये बर्न्सचे जोरदार स्वागत
जरी इंग्लंडला पिछाडीवर राहावे लागले असले तरी बर्न्सने एका बाजूने दिलेल्या लढतीचे इंग्लंड संघाकडून कौतुक करण्यात आले. बर्न्स शतक करुन ड्रेसिंगरुममध्ये पोहचताच त्याच्या संघसहकाऱ्यांनी त्याचे डाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच त्याला प्रोत्साहन दिले. हा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने ट्विटरला शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिले की ‘आमचा शतरवीर स्वागतास पात्र आहे.’
A well deserved reception for our centurion! ????????????
Scorecard & Videos: https://t.co/7Bh6SalvdP#ENGvNZ pic.twitter.com/NNsGvVJFBG
— England Cricket (@englandcricket) June 5, 2021
न्यूझीलंडकडे आघाडी
इंग्लंडचा पहिला डाव २७५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. मात्र न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेने २३ आणन कर्णधार केन विलियम्सन १ धावांवर बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडला चौथ्या दिवसाखेर २ बाद ६२ धावाच करता आल्या. चौथ्या दिवसाखेर न्यूझीलंडकडे १६५ धावांची आघाडी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मन जिंकलंस लेका! अवघ्या ९ वर्षीय मुलाची प्रतिभा पाहून दिग्गज स्टीव्ह वॉ देखील दंग; मानले आभार
दुर्दैवच अजून काय! पदार्पणात द्विशतक ठोकणारा ‘हा’ किवी फलंदाज जगतोय हलाखीचे आयुष्य
प्रवीण कुमारने शेअर केला सहकाऱ्यांसोबतचा जुना फोटो; चाहते म्हणाले, ‘वो दिन भी क्या दिन थे’!






