आजपासून(3 जानेवारी) दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. मात्र या सामन्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला. त्यांचा सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून तसेच उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला गुरुवारी सराव सत्राआधी फुटबॉल खेळताना दुखापत झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडावे लागले आहे.
त्याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. त्याने इंग्लंडकडून पहिल्या सामन्यात दोन्ही डावात मिळून सर्वाधिक 93 धावा केल्या होत्या.
इंग्लंडसाठी त्याचे मालिकेतून बाहेर पडणे हा दुसरा धक्का आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही दुसऱ्या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
इंग्लंडने बर्न्सऐवजी दुसऱ्या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात जॅक क्रॉलेला तर आर्चर ऐवजी डॉमनिक बेसला संधी दिली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने 107 धावांनी जिंकला होता. त्यामुळे ते सध्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहेत.
Bad news for England ahead of the second Test of their series in South Africa.
Opening batsman Rory Burns has been ruled out of the rest of the tour with an injury to his left ankle. pic.twitter.com/Jm4ecK5rGt
— ICC (@ICC) January 2, 2020
महाराष्ट्र संघाची लाजीरवाणी कामगिरी, तब्बल ८ खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद
वाचा????https://t.co/jnUmfOhi0O????#SERvMAH #RanjiTrophy #म #मराठी #Cricket
— Maha Sports (@Maha_Sports) January 3, 2020
केन विलियम्सनबद्दलची खास आठवण सांगताना विराट कोहली म्हणाला…
वाचा- ????https://t.co/rQceXH8nXy????#म #मराठी #Cricket @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 2, 2020