fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून शतक केल्यानंतर जीभ बाहेर काढून रॉस टेलर करतो अनोखे सेलिब्रेशन

February 8, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

बुधवारी (5 फेब्रुवारी) हेमिल्टन(Hemilton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिला वनडे (ODI) सामना पार पडला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडने भारताचा 4 विकेट्सने पराभव केला. तसेच 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात भारताने फलंदाज श्रेयस अय्यरच्या(Shreyas Ayyar) शतकी खेळीच्या (103) जोरावर 347 धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडकडून 348 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉस टेलरने (Ross Taylor)  नाबाद (109) शतकी खेळी केली आणि न्यूझीलंडला 48.1 षटकात विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

हे शतक केल्यानंतर टेलरने पुन्हा एकदा आपल्या शैलीत जीभ बाहेर काढत जल्लोष साजरा केला. शतकानंतर जीभ बाहेर काढत आनंद साजरा करण्याची टेलरची नेहमीची शैली आहे. आता ती त्याची सिग्नेचर स्टाईल झाली आहे.

5 वर्षांपुर्वीं (2015) पर्थ(Perth) येथील कसोटी सामन्यात(Test Match) टेलरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध द्विशतकी खेळी केली होती. 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टेलरने 290 धावा केल्या होत्या. त्यावेळी टेलरला जीभ बाहेर काढण्यामागचे कारण विचारले असता, त्याने याचा संपूर्ण खुलासा केला.

2007च्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेलरने दुसरे शतक केले होते. त्यावेळी क्षेत्ररक्षकांनी अनेकदा झेल सोडले होते. झेल सुटताच टेलर जीभ बाहेर काढत होता आणि हे त्याची मुलगी मॅकेन्झीला(Mackenzie) खूप आवडत असे. त्यामुळे प्रत्येक वेळी शतकानंतर जीभ बाहेर काढून तो त्याच्या मुलीला खुश करत असतो.

टेलरने जुलै 2014मध्ये त्याच्या अधिकृत ट्विटर अकांउटवर एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने त्याचा मुलगा जोंटीचा(Jonty) फोटो त्याने शेअर केला होता. या फोटोत जोंटीदेखील टेलरच्या शैलीत जीभ बाहेर काढताना दिसला. यावेळी टेलरने या फोटबरोबर ट्विटमध्ये लिहिले होते की ‘जसा बाप तसा मुलगा-जोंटी’.

रॉस टेलरला पुढील काही दिवसात एक अनोखा विक्रम करण्याची आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 टी20, 100 वनडे आणि 100 कसोटी सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू होण्याची संधी आहे. टेलरने आत्तापर्यंत 229 वनडे, 100 टी20 आणि 99 कसोटी सामने खेळले आहेत. भारताविरुद्ध 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत जर टेलर खेळला तर तो त्याचा 100 वा कसोटी सामना असेल.

दुसऱ्या वनडेत 'या' गोष्टीवर असेल सर्वांचेच लक्ष
वाचा👉https://t.co/jjtTdhFg3R👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ @imVkohli

— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020

टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेली 'ती' चूक न्यूझीलंड संघाला ठरली सर्वाधिक फायदेशीर
वाचा- 👉https://t.co/wbSWTnGdTX👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ

— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020


Previous Post

टेनिस स्पर्धेत जिरी वेस्ली, रिकार्डस बेरँकीस यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Next Post

या कारणामुळे शेन वॉर्न ‘बुशफायर क्रिकेट बॅश’ या सामन्यामधून पडला बाहेर….

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे दमदार पुनरागमन! पहिल्याच सामन्यात अर्धशतकासह विराट, रोहितची केली बरोबरी

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

एमएस धोनीच्या चेन्नई विरुद्ध मैदानात उतरताच ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर ‘मोठा’ विक्रम

April 10, 2021
Photo Courtesy: Instagram/@robinaiyudauthappa
IPL

कॉलेजमध्ये उथप्पाची सिनीयर होती त्याची पत्नी, पुढे अशी जुळली मनं; वाचा त्यांची ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’

April 10, 2021
Next Post

या कारणामुळे शेन वॉर्न 'बुशफायर क्रिकेट बॅश' या सामन्यामधून पडला बाहेर....

टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत केला हा भीमपराक्रम

बुमराह पुन्हा एकदा विकेटलेस; झाला हा नकोसा विक्रम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.