Sunday, May 22, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हसरंगाने काढला हैदराबादचा घाम, ६७ धावांनी विजय मिळवत बेंगलोरने गुणतालिकेतील स्थान केले बळकट

हसरंगाने काढला हैदराबादचा घाम, ६७ धावांनी विजय मिळवत बेंगलोरने गुणतालिकेतील स्थान केले बळकट

May 8, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
RCB-vs-SRH

Photo Courtesy: iplt20.com


रविवारी (दि. ०८ मे) आयपीएल २०२२मधील ५४वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला गेला. या सामन्यात बेंगलोर संघाने ६७ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील सातवा विजय होता. या विजयाचा हिरो वनिंदू हसरंगा ठरला. हसरंगाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार फाफ डू प्लेलिस (Faf Du Plessis) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विराट कोहली सोडला, तर इतर फलंदाजांना त्याचा हा निर्णय प्राथमिकरीत्या योग्य सिद्ध केला होता. बेंगलोरने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ३ विकेट्स घेत १९२ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाला १९.२ षटकात सर्व विकेट्स गमावत १२५ धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरने ६७ धावांनी सामना आपल्या नावावर केला.

That's that from Match 54. @RCBTweets win by 67 runs and add two important points to their tally.#TATAIPL pic.twitter.com/YOHIVDY3mT

— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2022

हैदराबादकडून फलंदाजी करताना फक्त राहुल त्रिपाठीलाच शानदार कामगिरी करता आली. त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. बेंगलोरविरुद्ध त्याने ३७ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एडेन मार्करमने २१ आणि निकोलस पूरनने १९ धावांचे योगदान दिले होते. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) देखील शून्य धावसंख्येवर धावबाद होऊन तंबूत परतला. हैदराबादचे ४ फलंदाज तंबूत परतले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त जोश हेजलवूडने २ विकेट्स घेतली. तसेच, ग्लेन मॅक्सवेल आणि हर्षल पटेलने १ विकेट आपल्या नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ८ चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार याने ४८ धावा, ग्लेन मॅक्सवेल याने ३३ धावा आणि दिनेश कार्तिक याने नाबाद ३० धावा केल्या. यावेळी माजी कर्णधार विराट कोहली याला पुन्हा एकदा गोल्डन डकवर बाद व्हावे लागले. मात्र, त्याचा संघाच्या धावसंख्येवर कोणताही परिणाम झाला नाही.

यावेळी हैदराबादकडून गोलंदाजी करताना जगदीश सुचिथने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३० धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कार्तिक त्यागीने १ विकेटवर आपले नाव कोरले.

या विजयासह बेंगलोर संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघ सहाव्या क्रमांकावर आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीला धक्क्यावर धक्के! सीएसकेविरुद्धच्या ‘करा अथवा मरा’ सामन्यापूर्वी पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल

ज्याने टीम इंडियात घेतली होती जागा, आता त्यालाच बाहेर करत चहल गाजवणार टी२० विश्वचषक?

कोलकाताचं चुकलं कुठं? लखनऊविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं कारण 


ADVERTISEMENT
Next Post
Kuldeep-Yadav-And-Yuzvendra-Chahal

कुलदीप- चहल जोडी तोडल्याने निवडकर्त्यांवर भडकला हरभजन; म्हणाला, 'कुलचा जोडीला विश्वचषकात घ्यावेच लागेल'

Dinesh-Karthik

'इशान- सॅमसन नकोच, टी२० विश्वचषकात फिनिशर म्हणून तोच हवा', कार्तिकच्या सलग ३ सिक्सनंतर नेटकऱ्यांची मागणी

Virat-Kohli

'कशाचा रनमशीन, हा तर डकमशीन', पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विराटची खरडपट्टी

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.