सोमवार रोजी (19 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सत्रातील 12 वा सामना पार पडला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या या सामन्यात राजस्थानला 45 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या सीएसकेने 20 षटकांत 9 गडी गमावून 188 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला राजस्थानचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावा करू शकला. त्यामुळे राजस्थानचा 45 धावांनी पराभव झाला. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर संघाचा कर्णधार संजू सॅमसनने पराभवाचे कारण सांगितले.
संजू सॅमसन म्हणाला की, “माझ्या मते विरोधी संघाने केलेली धावसंख्या ही पार करण्यास सोपी होती. परंतु मधल्या षटकांत आमच्या संघातील फलंदाजी फळी ढासळल्याने आम्हाला ते शक्य झाले नाही. आमच्या संघातील गोलंदाजांनी खरोखर चांगली कामगिरी केली. विरोधी संघाची फलंदाजी खूप दमदार होती. परंतु आम्ही अपेक्षेपेक्षा 10-15 धावा कमीच दिल्या. त्यामध्ये आम्हाला अपेक्षा नव्हती की चेंडूला वळण मिळेल. परंतु मैदानावर जास्त दव नसल्याने चेंडू अधिक वळण घेत होता. त्यामुळे आमच्यासाठी हे पाहणे थोडे धक्कादायक होते.”
राजस्थानकडून पदार्पण करून 6 बळी घेण्याची किमया करणाऱ्या चेतन सकारियाबद्दल बोलताना संजू सॅमसनने म्हटले की, “या सामन्यात सकारियाच्या गोलंदाजीचे चांगले पैलू पाहायला मिळाले. त्यातही आयपीएल उच्च धावसंख्या करणे गरजेचे असते. त्यामुळे फलंदाज फटकेबाजीच्या नादात खराब शॉट खेळून बाद होणे ही साधी गोष्ट आहे. म्हणून मी सध्या मूलभूत गोष्टींवर काम करत असून स्वत:ला थोडा वेळ देत आहे. त्यामध्ये चेतन सकारियासुद्धा खरोखरच चांगली कामगिरी करत आहे. आम्ही सामना हरला परंतु यामध्ये काही सकारात्मक बाबीसुद्धा राहिल्या आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईचा राजस्थानवर ‘सुपर विजय’; दिल्ली-मुंबईला पछाडत धोनीच्या पलटणचा गुणतालिकेत ‘या’ स्थानावर ताबा
मराठमोळ्या ऋतुराजचा पुन्हा फ्लॉप शो, ‘या’ भारतीय शिलेदाराला संधी देण्याच्या मागणीने धरला जोर
‘माझ्यामुळे संघावर पराभवाची नामुष्की ओढावली असती,’ विजयानंतर कॅप्टन धोनीने मान्य केली आपली चूक