बुधावारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएलचा बारावा सामना झाला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिवन स्मिथने पहिल्या १० षटकांतच तब्बल ७ गोलंदाज वापरले होते.
कर्णधार स्टिवन स्मिथने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सला पहिले यश मिळाले. जयदेव उनाडकतने सुनिल नारायणला त्रिफळाचीत केले. परंतू या पाचव्या षटकांपर्यंत स्मिथने तीन गोलंदाज वापरले होते.
त्यानंतर सहाव्या षटकापासून ते दहाव्या षटकापर्यंत त्याने चार गोलंदाज वापरले. पहिले षटक टाकल्यानंतर जोफ्रा आर्चरला स्मिथने १० षटकांपर्यंत परत संधी दिली नाही. त्यानंतर अंकित रजपूत दुसऱ्या षटकात गोलंदाजीला आला. त्यालाही चौथ्या षटकात संधी दिल्यानंतर १० षटकांपर्यंत संधी मिळाली नाही.
तिसरे षटक टाकलेल्या जयदेव उनाडकतने पाचवे षटक टाकले. त्यानंतर त्याला पहिल्या १० षटकांत संधी मिळाली नाही. त्यानंतर सहावे षटक टॉम करनने टाकले. सातवे षटक श्रेयस गोपाल, आठवे षटक रियान परागने नववे षटक परत श्रेयस गोपालला व दहावे षटक थेट राहुल तेवतियाला दिले. अशाप्रकारे पहिल्या १० षटकांतचं स्मिथने तब्बल ७ गोलंदाज बदलले.
१० षटक संपल्यावर केवळ जयदेव उनाडकत व राहुल तेवतिया या दोनच गोलंदाजांना विकेट मिळाली होती. तर कोलकाताने या १० षटकांत २ बाद ८२ धावा केल्या होत्या. गमतीची गोष्ट म्हणजे २०१४मध्ये दुबईतच पहिल्या १० षटकांत कोलकाताविरुद्धच राजस्थानने ७ गोलंदाज वापरले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्च्या विजयाचा नायक ठरलेला तेवतिया म्हणतो, ‘या’ भारतीय गोलंदाजांनी मला खूप मदत केली
तेवतियाची कमाल! ५ षटकार ठोकल्यानंतर घरच्यांच्या डोक्याला ताप, तब्बल…
ट्रेंडिंग लेख-
चेन्नई-पंजाबला अस्मान दाखवणाऱ्या दिल्लीला हैदराबादने लोळवलं, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून