आयपीएलच्या 13 व्या हंगामात शनिवारी (17 ऑक्टोबर) 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात दुबईत खेळला जाईल. यानंतर दिल्ली कॅपिटलस आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रात्री 7.30 वाजता शारजाहमध्ये सामना होईल.
मागील सामन्यात राजस्थानचा झाला पराभव
या हंगामात 5 सामने गमावलेला राजस्थान संघ बेंगलोरविरुद्ध जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहे. या हंगामात झालेल्या मागील सामन्यात बंगलोरने राजस्थानला 8 गडी राखून पराभूत केले होते. अशा परिस्थितीत राजस्थानला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
चेन्नईची कामगिरी आहे खराब
यानंतर रात्री जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दिल्ली संघ चेन्नई सुपर किंग्सचा सामना करेल. हंगामात 6 सामने जिंकून दिल्ली प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या वाटेवर आहे. आतापर्यंत चेन्नईची कामगिरी काही खास राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आता त्यांना प्रत्येक सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. या हंगामात दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा 44 धावांनी पराभव केला होता.
बेंगलोर गुणतालिकेत तिसऱ्या तर राजस्थान सातव्या स्थानावर
गुणतालिकेत बेंगलोर संघ तिसर्या क्रमांकावर आहे. बंगलोरने या हंगामात आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून त्यांचे 10 गुण आहेत. त्याचबरोबर राजस्थान 6 गुणांसह 7 व्या स्थानावर आहे. राजस्थानने 8 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत.
दिल्ली दुसऱ्या तर चेन्नई सहाव्या क्रमांकावर
भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने या हंगामात शानदार प्रदर्शन केले आहे. दिल्लीने या हंगामात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 12 गुणांसह गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर हंगामात चेन्नईचा फॉर्म काही खास नाही. चेन्नई सहा गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. चेन्नईने या हंगामात 8 पैकी 3 सामने जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत.
खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल
दुबई आणि शारजाहमधील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ राहील. दुबईमध्ये तापमान 22 ते 36 डिग्री सेल्सियस आणि शारजाहमध्ये 23 ते 36 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहील. दोन्ही ठिकाणी खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे संथ गतीची खेळपट्टी असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. दुबईमध्ये आयपीएलपूर्वी झालेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% आहे. शारजाह येथे झालेल्या शेवटच्या 13 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 69% आहे.
दुबई मधील मैदानाबद्दल माहिती
या मैदानावर एकूण खेळले गेलेले टी20 सामने : १
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 122
शारजाहमधील मैदानाबद्दल माहिती
या मैदानावर खेळले गेलेले एकूण टी20 सामने : 13
प्रथम फलंदाजीचा करताना मिळालेले विजय : 9
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 4
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 149
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 131
बेंगलोरचा विजय मिळवण्याचा दर राजस्थानपेक्षा आहे कमी
लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा विजय मिळवण्याचा दर 50.65% आहे. राजस्थानने एकूण 155 सामने खेळले असून 78 मध्ये विजय मिळवला आणि 75 मध्ये पराभव झाला आहे. 2 सामने अनिर्णित होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विजय मिळवण्याचा दर 47.83% आहे. बेंगलोरने एकूण 189 सामने खेळले असून त्यापैकी 89 सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि 96 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. 4 सामने अनिर्णीत होते.
आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर आहे सर्वाधिक
आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय मिळवण्याचा दर 60.17% आहे. सीएसकेने आतापर्यंत एकूण 173 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 103 सामने जिंकले आहेत आणि 69 सामने गमावले. एक सामना अनिर्णित होता. त्याचवेळी दिल्लीचा विजय मिळवण्याचा दर 45.08% आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 185 सामने खेळले आहेत त्यापैकी 83 सामने जिंकले आहेत आणि 100 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. 2 सामने अनिर्णित होते.
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिक आणि केकेआर संघ, अशी होती गेल्या २ वर्षांतील आकडेवारी
मुंबईच्या सांघिक कामगिरीपुढे कोलकाताचा पालापाचोळा, पुन्हा ठरली अव्वल
ये हुई ना बात! सूर्यकुमारची ‘स्काय’ जंप आणि केकेआर चिंतेत, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष
यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे