fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विजय- राहुलला जे ८ डावात जमलं नाही ते मयांक अगरवालने २ डावात करुन दाखवलं

मेलबर्न। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 54 धावा केल्या आहेत. भारताकडून मयंक अगरवाल 28 धावांवर आणि रिषभ पंत 6 धावांवर नाबाद खेळत आहेत.

तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आला आहे. भारत 346 धावांनी आघाडीवर आहे.

अगरवालने या सामन्यात पहिल्या डावात 76 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावातही त्याने चांगली सुरुवात करत भारताच्या विकेट जात असताना एक बाजू सांभाळली आहे. त्याच्या या सामन्यात 2 डावात मिळून तिसऱ्या दिवसाखेर 104 धावा केल्या आहेत.

अगरवालच्या या धावा केएल राहुल आणि मुरली विजयने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात मिळून केलेल्या धावांपेक्षाही जास्त आहेत.

राहुल आणि विजय यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात मिळून 97 धावा केल्या आहेत. यात राहुलच्या 48 आणि विजयच्या 49 धावांचा समावेश आहे. त्यांच्या या खराब कामगिरीमुळे त्यांना मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अंतिम 11 जणांच्या संघातून वगळण्यात आले आहे.

त्यांच्या ऐवजी या सामन्यात सलामीला हनुमा विहारी आणि अगरवालला संधी दिली आहे. या दोघांनी या संधीचा फायदा घेत पहिल्या डावात 40 आणि दुसऱ्या डावात 28 धावांची भागीदारी रचली.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: कर्णधार टिम पेनची बडबड थांबेना, आता रिषभ पंतला केले टार्गेट

तब्बल ३५ वर्षांनी आली टीम इंडियावर एवढी मोठी नामुष्की

१२ वर्षांपूर्वी कुंबळेने केलेला विक्रम बुमराह, शमीकडून मोडीत

You might also like