fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी रसलने तोडला कॅमेरा; पहा व्हिडिओ

Russel Loading kkr batsmans shot in nets shatters camera glass during net session watch

September 23, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Screengrab: Twitter/KKRiders

Screengrab: Twitter/KKRiders


इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल 2020) 13 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आज 23 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. केकेआरचा संघ यापूर्वी जोरदार प्रशिक्षण घेत आहे. आयपीएलमधील सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आंद्रे रसलने तोडला कॅमेरा

नेट सरावादरम्यान दरम्यान, आंद्रे रसलने असा फटका मारला ज्यामुळे मैदानातील कॅमेरा तुटला. या व्हिडिओमध्ये रसल त्याच्या नेहमीच्या शैलीत मोठे फटके खेळताना दिसत आहे. केकेआरच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे.

💥 Oh gosh! That’s SMASHED – wait for the last shot..#MuscleRussell warming up to his devastating best!

@Russell12A #KKRHaiTaiyaar #Dream11IPL pic.twitter.com/0NsOHJ2Pja

— KolkataKnightRiders (@KKRiders) September 21, 2020

मागच्या हंगामात रसलने केली होती उत्तम फटकेबाजी

रसल हा गेल्या हंगामात केकेआरचा सर्वात यशस्वी क्रिकेटपटू होता. त्याने 204.81 च्या स्ट्राईक रेटने 14 सामन्यांच्या 13 डावांमध्ये 510 धावा केल्या होत्या आणि या काळात त्याने चार अर्धशतके केली होती. याशिवाय रसलने 11 गडीही बाद केले होते. मागील हंगामात त्याने सर्वाधिक 52 षटकार ठोकले होते.

दुसर्‍या क्रमांकावर टी20 चा धडाकेबाज फलंदाज असलेल्या ख्रिस गेलने 34 षटकार ठोकले होते. यावर्षी रसलकडून केकेआर संघ व्यवस्थापनाला आणि चाहत्यांनाही अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असेल. रसल हा असा खेळाडू आहे जो अखेरच्या क्षणी सामना बदलू शकतो.

आजच्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ एका बाजूला पहिला सामना गमावल्या नंतर मैदानात उतरेल तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात केकेआर आपली मोहीम सुरू करेल.

या हंगामात कोलकातानेही सर्वाधिक 15.5 कोटी रुपये खर्च करून जगातील अव्वल नंबरचा गोलंदाज पॅट कमिन्सला संघात समाविष्ट केले आहे. याशिवाय इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन ज्याने 50 षटकांचा विश्वचषक जिंकला आहे, तो या हंगामात केकेआरकडून खेळताना दिसणार आहे.

केकेआरचा संघ:

दिनेश कार्तिक (कॅप्टन), शिवन मावी, संदीप वॉरिअर, कुलदीप यादव, इयन मॉर्गन, पॅट कमिन्स, हॅरी गार्ने, सुनील नारायण, निखिल नायक, एम सिद्धार्थ, आंद्रे रसल, लॉकी फर्ग्युसन, पी कृष्णा, शुभमन गिल, नितीश राणा, सिद्धेश लाड , कमलेश नागरकोटी, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, ख्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी.

महत्त्वाच्या बातम्या-

-वॉर्नरच्या हैदराबादला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पडला आयपीएल बाहेर

-जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसनने करुन दाखवलं

-पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

ट्रेंडिंग लेख-

-हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड काय आहे भाऊ ?

-१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा

-चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद


Previous Post

मुंबईकर असूनही रोहितला न जमलेला विक्रम विंडीजच्या पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी केला

Next Post

रोहितसह आयपीएलमध्ये २०० षटकार मारणाऱ्या स्फोटक फलंदाजांची यादी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

“टी२० मालिका विजयानंतर विराटच्या ‘त्या’ कृत्याने डोळ्यात पाणी आणलं”, नटराजनने व्यक्त केल्या भावना

January 26, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

“इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ‘ही’ गोष्ट केल्यास अर्धी मिशी काढेन”, अश्विनचं पुजाराला अनोखं चॅलेंज 

January 26, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

रोहितसह आयपीएलमध्ये २०० षटकार मारणाऱ्या स्फोटक फलंदाजांची यादी

मैदानावरील 'त्या' घटनेमुळे साक्षी धोनीचा पारा चढला, सोशल मीडियावरुन केली टीका

Photo Courtesy: Twitter/KKRiders

१५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूने पहिल्याच षटकात दिल्या १५ धावा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.