भारताने शुक्रवारी (दि. 14 जुलै) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 साठी संघाची घोषणा केली आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली असून, महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघाची जबाबदारी मिळाल्यानंतर आता ऋतुराजची पहिली प्रतिक्रिया आली असून, त्याने विजेतेपदाचा निर्धार केला आहे.
या स्पर्धेसाठी शिखर धवनकडे भारतीय संघाची जबाबदारी असेल असे बोलले जात होते. मात्र, अनपेक्षितपणे ऋतुराजकडे नेतृत्व दिले गेले. ऋतुराजने या आधी महाराष्ट्र संघाचे तसेच महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पुणेरी बाप्पा संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचा हा कर्णधारपदाचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येऊ शकतो. कर्णधारपद मिळाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया देताना तो म्हणाला,
🗣️ “𝑻𝒉𝒆 𝒅𝒓𝒆𝒂𝒎 𝒘𝒐𝒖𝒍𝒅 𝒃𝒆 𝒕𝒐 𝒘𝒊𝒏 𝒕𝒉𝒆 𝒈𝒐𝒍𝒅 𝒎𝒆𝒅𝒂𝒍, 𝒔𝒕𝒂𝒏𝒅 𝒐𝒏 𝒕𝒉𝒆 𝒑𝒐𝒅𝒊𝒖𝒎 𝒂𝒏𝒅 𝒔𝒊𝒏𝒈 𝒕𝒉𝒆 𝒏𝒂𝒕𝒊𝒐𝒏𝒂𝒍 𝒂𝒏𝒕𝒉𝒆𝒎 𝒇𝒐𝒓 𝒕𝒉𝒆 𝒄𝒐𝒖𝒏𝒕𝒓𝒚”
A happy and proud @Ruutu1331 is excited to lead #TeamIndia at the #AsianGames 😃 pic.twitter.com/iPZfVU2XW8
— BCCI (@BCCI) July 15, 2023
“या मोठ्या स्पर्धेसाठी मला संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय व निवड समितीचे आभार व्यक्त करतो. राष्ट्रीय संघासाठी खेळणे हीच खूप मोठी गोष्ट असते. इथे मला नेतृत्व करण्याचा मान दिला. माझ्यासह इतर सर्व खेळाडूंसाठी ही एक सुवर्णसंधी असेल.”
बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो पुढे बोलताना म्हणाला,
“आम्ही सर्वजण युवा असून मागील वर्षभरापासून एकत्र आहोत. लहानपणापासून देशाच्या इतर खेळाडूंना एशियन गेम्समध्ये पदक जिंकताना पाहत आलो आहोत. माझे देखील तेच स्वप्न आहे की, भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना सुवर्णपदक गळ्यात असावे.”
यावेळी प्रथमच पुरुष क्रिकेटचा समावेश एशियन गेम्समध्ये करण्यात आला आहे. या स्पर्धा ज्या कालावधीत होणार आहेत त्या कालावधीत भारतीय संघ वनडे विश्वचषकाची तयारी करत असेल. त्यामुळे या स्पर्धेसाठी युवा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला गेला.
(Ruturaj Gaikwad First Reaction After Selected As Team India Captain In Asian Games 2023)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । भारतीय संघाची घोषणा, ‘असे’ आहे हरमनप्रीतच्या नेतृत्वातील स्क्वॉड
भारतीय संघात निवड होताच रिंकूची मोठी प्रतिक्रिया, फक्त एकाच शब्दात झाला व्यक्त