भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थित शिखर धवन संघाचे नेतृत्व करतोय. पावसामुळे प्रत्येकी 40 षटकांच्या केलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत 4 बाद 249 धावा धावफलकावर लावल्या. या सामन्यात पदार्पण केलेल्या भारताच्या ऋतुराज गायकवाड याला मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 250 भावांचा पाठलाग करण्यासाठी भारतातर्फे कर्णधार शिखर धवन व शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. मात्र, त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्यांनी अनुक्रमे 4 व 3 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर या सामन्यातून वनडे पदार्पण केलेला ऋतुराज गायकवाड फलंदाजीला आला. मात्र, तो सुरुवातीपासूनच धावा करण्यासाठी संघर्ष करू लागला. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा व लुंगी एन्गिडी यांनी सुरुवातीला त्याला त्रस्त केले. त्यानंतर केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांच्याविरुद्धही तो खुलून खेळू शकला नाही. शम्सीच्या चेंडूवर यष्टीचित होण्याआधी त्याने 42 चेंडूंमध्ये एका चौकाराच्या मदतीने 19 धावा केल्या.
भारताचा प्रमुख संघ टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर या वनडे मालिकेत युवा भारतीय खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत हंगामात सातत्याने धावा काढणाऱ्या ऋतुराजला देखील या संघात स्थान मिळाले होते. या पहिल्या सामन्यात त्याला वनडे पदार्पणाची संधी देखील देण्यात आली. कर्णधार शिखर धवनच्या हातून त्याला ही कॅप मिळाली. भारतासाठी वनडे क्रिकेट खेळणारा तो 245 वा खेळाडू बनला. ऋतुराजने आतापर्यंत भारतीय संघासाठी 9 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावे एका अर्धशतकासह 135 धावा जमा आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात छेद! रबाडाचे आयपीएलबद्दल मोठे भाष्य; म्हणाला, ‘भारतीयांच्या कमजोरीविषयी…’
क्रिकेटला काळीमा फासणारी बातमी! आयपीएलच्या प्रसिद्ध खेळाडूला विमानतळावरून अटक, बला’त्काराचा आरोप