भारतीय वरिष्ठ संघ काही दिवसात ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तर त्याआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला आहे. ज्यामध्ये त्यांचा ऑस्ट्रेलिया अ संघाशी 1 ऑक्टोबर पासून चार दिवसीय लिस्ट ए कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जो आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजांनी पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. या दौऱ्यात ज्यांच्याकडून सगळ्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, असा कर्णधार ऋतुराज गायकवाड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. गायकवाडच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अजिबात चांगली झालेली नाही.
ऑस्ट्रेलिया अ दौऱ्यावरील पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारत अ संघ फलंदाजीसाठी आला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी डावाची सुरुवात केली. ज्यात गायकवाडने बकिंघमला दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गोल्डन डक आऊट झाला. जर आपण ईश्वरनबद्दल बोललो तर त्याची बॅट देखील काही चमत्कार करू शकली नाही. ज्यामध्ये तो 30 चेंडूंचा सामना केल्यानंतर केवळ 7 धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात ईश्वरनचा बॅकअप सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये ही सुरुवात संघ आणि त्याच्यासाठी मोठ्या तणावापेक्षा कमी नाही.
– Duck for Ruturaj.
– Duck for Nitish.
– 4 runs for Ishan.
– 7 runs for Easwaran.
– 9 runs for Indrajith.
– 21 runs for Sudarshan.
– 36 runs for Padikkal.INDIA A 79 FOR 7 vs AUSTRALIA A IN THE FIRST MATCH….!!!! 🤯 pic.twitter.com/XH93KMyLSX
— Johns. (@CricCrazyJohns) October 31, 2024
या सामन्यात भारतीय अ संघा 107 धावांत गडगडला. ज्यामध्ये सर्वच फलंदाजींनी निराशा केली. ज्यामध्ये देवदत्त पडिकलने सर्वाधिक 36 धावा केल्या. याशिवाय साई सुदर्शन 21 धावा करण्यात नक्कीच यशस्वी ठरला. मेगा लिलावापूर्वी खेळाडूंची ही कामगिरी डोकेदुखी ठरु शकते.
हेही वाचा-
रिषभ पंतची मागणी अपूर्ण, आता केकेआरच्या बड्या स्टारला दिल्ली कॅपिटल्स करणार कर्णधार?
केवळ 3 टी20 सामने खेळून नशीब उजळले, या खेळाडूला होणार करोडोंचा फायदा
क्रिकेट विश्वात खळबळ; कर्णधाराच्या घरातून दागिने आणि मौल्यवान पदके चोरीला!