क्रिकेटटॉप बातम्या

अय्यर संघात असतानाही ऋतुराज गायकवाडला केले उपकर्णधार, BCCI ट्रोल

चूक कोणाकडून होत नसते, अर्थातच सर्वांकडून होते. काही चुका अशा असतात, ज्याकडे नेटकरीही दुर्लक्ष करतात. मात्र, जबाबदार व्यक्ती किंवा संस्थेकडून जर ती चूक झाली, तर त्यावर नेटकरी ताशेरे ओढल्याशिवाय राहत नाहीत. असेच काहीसे सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय बोर्डाबाबत घडले आहे. बीसीसीआयकडून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या टी20 सामन्यादरम्यान मोठी चूक घडली, ज्यावर नेटकरी बीसीसीआयला ट्रोल करत प्रतिक्रिया देत आहेत.

बीसीसीआयचं काय चुकलं?
झालं असं की, शुक्रवारी (दि. 1 डिसेंबर) रायपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) संघ आमने-सामने होते. हा 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना होता. विशेष म्हणजे, बीसीसीआय बोर्डाने आधीच स्पष्ट केले होते की, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा अखेरच्या दोन सामन्यांसाठी संघात परतेल. तसेच, तो उपकर्णधार म्हणून सामना खेळेल. असे असतानाही जबाबदार बीसीसीआयने नाणेफेक झाल्यानंतर जेव्हा सोशल मीडियावर संघाची प्लेइंग इलेव्हन शेअर केली, तेव्हा त्यांच्याकडून मोठी चूक घडली.

बीसीसीआयने चौथ्या टी20 सामन्यासाठी एक्स (पूर्वीचं ट्विटर) या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन जाहीर केले. मात्र, यावेळी त्यांच्याकडून मोठी चूक झाली. ती अशी की, त्यांनी श्रेयस अय्यर याच्या ऐवजी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नावापुढे उपकर्णधार असे लिहिले. खरं तर, ऋतुराज हा पहिल्या 3 सामन्यांसाठी संघाचा उपकर्णधार होता, पण चौथ्या टी20तही त्याच्या नावापुढे उपकर्णधार लिहिल्यामुळे नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

काय म्हणाले नेटकरी?
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “बीसीसीआयने श्रेयस अय्यरची खिल्ली उडवली. त्याला नुकतेच उपकर्णधार बनवले होते.”

दुसऱ्या एका युजरने प्रश्न विचारत लिहिले की, “आज उपकर्णधार कोण आहे? श्रेयस की ऋतुराज?”

आणखी एकाने असेही म्हटले की, “श्रेयस अय्यरला उपकर्णधार घोषित केले नाही का?”

सामन्याचा आढावा
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 174 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून रिंकू सिंग (46), यशस्वी जयसवाल (37), जितेश शर्मा (35) आणि ऋतुराज गायकवाड (32) यांनी 30 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यर याला खास प्रदर्शन करता आले नाही. तो 7 चेंडूत 8 धावा करून बाद झाला.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना यश मिळाले नाही. त्यांनी 20 षटकात 7 विकेट्स गमावत फक्त 154 धावा केल्या. यावेळी भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेल याने सामनावीर पुरस्कार जिंकला. त्यामुळे हा सामना भारताने 20 धावांनी जिंकला. (Ruturaj Gaikwad made vice-captain even when shreyas Iyer was in the team, BCCI trolls)

हेही वाचा-
भारतात खेळलेल्या सगळ्या क्रिकेटपटूंचा टी20 रेकॉर्ड मराठमोळ्या ऋतूराज गायकवाडने मोडला, पाहा विक्रम
टीम इंडियाने मोडला पाकिस्तानचा अतिशय महत्त्वाचा Record, आता…

Related Articles