सोमवारी (28 नोव्हेंबर) विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. अहमदाबाद येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 58 धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी करणारा महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला. मात्र, त्याचवेळी सामनावीर पुरस्कार स्वीकारताना त्याने केलेल्या एका कृतीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऋतुराज गायकवाड याने हा निर्णय चुकीचा ठरवला. त्याने 138.36च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याने 159 चेंडूत नाबाद 220 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 16 षटकांराचा समावेश होता. त्याने डावाच्या 49 व्या षटकात सात षटकार मारत विश्वविक्रमही रचला. त्याच्या याच योगदानाच्या जोरावर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशसमोर विजयासाठी 331 धावांचे आव्हान ठेवले.
Ruturaj Gaikwad called up Rajvardhan Hangargekar and share his Man of the match after the match.
Great gesture from Ruturaj Gaikwad! pic.twitter.com/oxFAKNPiFT
— Tanuj Singh (@ImTanujSingh) November 28, 2022
या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा संघ गडगडला. युवा अष्टपैलू वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगारगेकर याने भेदक गोलंदाजी करताना उत्तर प्रदेशचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याच्या याच गोलंदाजीमुळे महाराष्ट्र संघ 58 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
या सामन्यानंतर सामनावीर म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली. मात्र, त्यावेळी ऋतुराजने सर्वांचे मन जिंकणारी कृती केली. सामनावीर पुरस्कार स्वीकारत असताना त्याने राजवर्धन याला देखील आपल्या सोबत बोलावले. त्याने या पुरस्काराच्या तोदेखील मानकरी असल्याचे म्हटले. त्याच्या या कृतीमुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
ऋतुराज व राजवर्धन हे केवळ महाराष्ट्रच नव्हेतर आयपीएलमध्ये देखील एकाच संघासाठी खेळतात. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग संघाचा ऋतुराज मागील चार वर्षांपासून तर राजवर्धन दोन वर्षांपासून भाग आहे.
(Ruturaj Gaikwad Shared Man Of The Match Award With Rajvardhan Hangargekar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजय हजारे ट्रॉफी: दमदार कामगिरीसह महाराष्ट्र उपांत्य फेरीत; अशा रंगणार सेमी-फायनलच्या लढती
पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, जस क्रिकेट अकादमी संघांचा मोठा विजय