चेन्नई सुपर किंग्सच्या २३ वर्षीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने गुरुवारी (२९ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली. त्याच्या अफलातून खेळीमुळे चेन्नईने ६ विकेट्सने तो सामना खिशात घातला. सामन्यानंतर बोलताना ऋतुराजने त्याच्या मोठ-मोठ्या शॉट्समागचे रहस्य सांगितले.
कोलकाताविरुद्ध कमालीचे फलंदाजी प्रदर्शन
कोलकाताविरुद्धच्या रंगतदार लढतीत ऋतुराज गायकवाडने ५३ चेंडूत ७२ धावांची अफलातून खेळी केली. दरम्यान त्याने १३५.८५ च्या स्ट्राईक रेटने ६ चौकार आणि २ षटकारही लगावले होते. त्याच्या या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने सहज कोलकाताचे १७३ धावांचे लक्ष्य गाठले. एवढेच नव्हे तर, ऋतुराज गायकवाडला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जीममधील मेहनतीमुळे झालं शक्य
पुरस्कार सोहळ्यामध्ये या युवा फलंदाजाला त्याच्या जोरदार शॉट्समागील ताकदीचे गुपित काय आहे?, हे विचारण्यात आले. यावर उत्तर देत तो म्हणाला की, “माझ्या जीममधील अथक परिश्रमाचे हे परिणाम आहेत. मी जीममध्ये खूप मेहनत करत असतो. एवढंच नाही तर, माझे सिक्स पॅक्ससुद्धा आहेत.”
आढळला होता कोरोना पॉझिटिव्ह
आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी ऋतुराज गायकवाड कोरोना संक्रमित झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याने या हंगामात आतापर्यंत केवळ ५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २ अर्धशतकांच्या मदतीने १४२ धावा ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या चेन्नई संघातील ‘हा’ खेळाडू सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असेल, गौतम गंभीरची भविष्यवाणी
वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
ट्रेंडिंग लेख-
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला