भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (३१ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी १८ जणांचा संघ जाहीर केला. या संघात २४ वर्षीय ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला देखील संधी मिळाली आहे. त्याने २०२१ वर्षात त्याच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आता त्याच्या भारतीय संघातील निवडीबद्दल भारतीय निवड समीतीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ऋतुराज यशस्वी होऊ शकतो असे म्हटले आहे.
भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९ जानेवारीपासून वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा वनडे सामना अनुक्रमे २१ आणि २३ जानेवारी रोजी होणार आहे.
ऋतुराजबद्दल बोलताना चेतन शर्मा म्हणाले, ‘त्याला अगदी योग्य वेळी संधी मिळाली आहे. तो टी२० संघात होता आणि आता तो वनडे संघातही आला आहे. निवडकर्त्यांना वाटते की त्याला ज्या संघात संधी मिळेल, तो देशासाठी त्याच्या कामगिरीने कमाल करेल.’
चेतन शर्मा पुढे म्हणाले, ‘आम्ही त्याची निवड केली आहे. आता हे संघव्यवस्थापनावर अवलंबून आहे की, त्याला अंतिम ११ जणांच्या संघात कधी खेळवायचे, त्यांना संघसंयोजनानुसार त्याची कधी गरज आहे. याबद्दल आम्ही चर्चा करू. पण, सध्या तरी, तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात होता आणि आता तो वनडे संघात आहे. त्याने चांगली कामगिरी केल्याचे फळ त्याला मिळाले आहे.’
अधिक वाचा – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर; रोहित बाहेर, राहुल कर्णधार तर बुमराह उपकर्णधार
ऋतुराजसाठी २०२१ वर्ष फलदायी ठरलं आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४ शतकांसह ६०३ धावा केल्या. तसेच याचवर्षी त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. इतकंच नाही, तर आयपीएल २०२१ मध्ये तो सर्वाधिक धावा करणाराही खेळाडू ठरला. त्याने १६ डावात ६३५ धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. इतकंच नाही, तर त्याला चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी ६ कोटी रुपयात संघात कायम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्वकालीन महान प्रशिक्षक काढणार इंग्लडला पराभवाच्या गर्तेतून? प्रशिक्षण देण्याची व्यक्त केली इच्छा
कधी द्रविडला नाचताना पाहिलेले का? दक्षिण आफ्रिकेत तेही घडले! पाहा व्हिडिओ
आता तयारी मालिकेत विजयी आघाडीची! दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचा जोरदार सराव, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ पाहा – बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही… |