पुणे । पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द ऍक्वागार्ड चॅम्पियनशिप आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड कप(ग्रेड 2) या शर्यतीत ब्रॉंक्स या घोड्याने 2000 मीटर या अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.
रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्लूआयटीसी) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द ऍक्वागार्ड चॅम्पियनशिप आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड कप(ग्रेड2 ) या लढतीत जे.एम.लाइव्हस्टोक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी जयदेव एम मोदी यांच्या मालकीच्या ब्रॉंक्स या घोड्याने 2 मिनिट 03 सेकंद व 824 मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा नीरज रावळ हा जॉकी होता, तर नोशेर कामा ट्रेनर होता.
सविस्तर निकाल: द ऍक्वागार्ड चॅम्पियनशिप आरडब्ल्यूआयटीसी लिमिटेड गोल्ड कप(ग्रेड 2)
विजेता: ब्रॉंक्स, उपविजेता: रईस.