भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्यावर बीसीसीआयने जवळपास 8 वर्षापूर्वी आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यामुळे त्याच्यावर बंदी घातली होती. त्याच्यावर घालण्यात आलेला कालावधी मागील सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाला आहे. त्यामुळे तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
श्रीसंत जानेवारी महिन्यापासून खेळल्या जाणार्या स्पर्धेत केरळ संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. त्याची केरळ संघात निवड सुद्धा झाली आहे. केरळ संघाच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. तो वेगवान गोलंदाज आहे आणि आक्रमक सुद्धा आहे. 2019 मध्ये त्याच्यावर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी कमी करून 7 वर्ष करण्यात आला होता. त्यामुळे तो आता क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय.
केरळ संघाने खेळलेल्या सराव सामन्यात श्रीसंत सहभागी झाला होता. या सामन्यात तो आक्रमक गोलंदाजी बरोबर स्लेजींग करताना दिसला. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजी करताना जुन्या श्रीसंतची आठवण झाली. 37 वर्षीय श्रीसंत मध्ये जरा सुद्धा बदल झालेला नाही. त्याने पूर्ण गतीने गोलंदाजी केली. तो या व्हिडिओ मध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे.
श्रीसंतने एका इंग्रजी दैनिकासोबत म्हणाला होता की त्याला 2023 साली भारतात होणार्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. त्यासाठी तो सध्या सराव सुद्धा करत आहे. त्यामुळे तो देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला आहे. त्याचबरोबर तो आयपीएल स्पर्धेतील संघाची माहिती गोळा करत आहे.
श्रीसंत म्हणाला होता की, “संजू सॅमसन आणि टिनू मला म्हणाले होते की ते माझ्या पुनरागमनाबद्दल हा चषक भेट देणार आहेत. परंतु मला फक्त सय्यद मुश्ताक अली चषक नव्हे तर रणजी आणि इराणी चषक जिंकायचा आहे. मी जर चांगली कामगिरी केली, तर मला अजून संधी मिळतील. मी आयपीएल स्पर्धेबद्दल माहिती प्राप्त करत आहे आणि हे सांगू इच्छितो की, मी पूर्णपणे फिट आहे. त्याचबरोबर उत्तम गोलंदाजी करत आहे. माझे ध्येय आहे, भारताला 2023 चा विश्वचषक मिळवून द्यायचा.”
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड
बाबा झालो रे!! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या घरी हलला पाळणा, पोस्टद्वारे दिली खुशखबर
ब्रेकिंग! उर्वरित कसोटी सामन्यांकरिता भारताच्या कसोटी संघात उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी