भारतीय संघाच्या आगमी दौऱ्यात केएल राहुल याने पुनरागमन केल्यानंतर शिखर धवनचे चाहते मात्र नाराज आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यात धवनलान कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. पण राहुलने अचानक पुनरागमन केल्यानंतर कर्णधारपदाची सूत्रे धवनकडून काढून त्याला सोपवली गेली आहेत. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे धवनचे चाहते आणि इतरही वर्गातून निराजी व्यक्त होत आहे. भारताचे माजी दिग्गज खेळाडू साबा करीम यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) भारताचा कर्णधार होता. यजमान संघाविरुद्ध धवनच्या नेतृत्वातील भारताने उत्कृष्ठ प्रदर्शन केले. भारताने ही एकदिवसीय मालिका ०-३ अशा अंतराने जिंकली. कर्णधाराच्या रूपात धवनने चांगले प्रदर्शन केलेच, पण फलंदाजाच्या रूपातही तो कुठे कमी पडला नाही. त्याचे वेस्ट इंडीजमधील प्रदर्शन पाहून निवडकर्त्यांनी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला कर्णधारपदी नियुक्त केले होते. पण दौऱ्यावर जाण्यापूर्वीच धवन आणि त्याच्या चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी समोर आली.
माध्यमांशी बोलताना भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि मध्यंतरीच्या काळात मुख्य निवडकर्ते म्हणून कारभार पाहिलेले सबा करीम (Saba Karim) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “केएल राहुल संघाचा सदस्य म्हणून देखील ही मालिका खेळू शकतो. त्याला कर्णधार किंवा उपकर्णधार बनवणे गरजेचे नव्हते. तो मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. धवन संघाचा वरिष्ठ खेळाडू आहे, ज्याने व्हाईट बॉल क्रिकेटचा चांगले प्रदर्शन केले आहे. तुम्हा एकदा जर कर्णधाराची घोषणा केली होती, तर त्याला महत्व दिले पाहिजे होते.”
सबा करीमच्या मते संघाचे कर्णधारपद वारंवार वेगवेगळ्या खेळाडूंकडे सोपवणे योग्य नाहीये. त्यांच्या मते एखादा कर्णधार आगामी सामन्यासाठी योजना बनवतो आणि अशातच जर तुम्हा कर्णधार बदलला, तर संघाला त्याच्या तोटाच होऊ शकतो. या निर्णयामुळे अनेक क्रिकेटपटूंचे मनोबल खालावते. दरम्यान, मागच्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर तब्बल सात खेळाडूंना भारताचे नेतृत्व केले आहे. यापूर्वी श्रीलंकन संघाने २०१७ मध्ये अशी कामगिरी केली होती. या निर्णयामुळे चाहते आणि देश विदेशातील दिग्गज खेळाडू प्रश्न उपस्थित करत आहेत.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते
एशिया कपमध्ये रोहित ठरणार ‘हिट’मॅन! एकाहून एक बड्या विक्रमांचे रचणार मनोरे
VIDEO। शांत अन् संयमी पुजाराचा रौद्रावतार पाहिलात का? गोलंदाजाची केलीये कडक धुलाई