भारताचा युवा संघ संध्या आयर्लंड दौऱ्यावर, तर वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध देखील भारताच्या याच खेळाडूंना चांगले प्रदर्शन केले होते. अशात वरिष्ठ खेळाडूंचे प्रदर्शन काहीसे फिके पडत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी निवडकर्ते सबा करीम यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सबा करीम (saba karim) यांच्या मते रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल, जेव्हा टी-२० संघात माघारी येतील, तेव्हा थेठ प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवतील. पण त्यांच्या मते विराट, रोहित आणि राहुलसारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील खेळाविषयीचा त्यांचा दृष्टीकोण बदलला पाहिजे.
माजी निवडकर्ते म्हणाले की, जर त्यांच्या फलंदाजीविषयी प्रश्न निर्माण होत असतील, तर त्यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल. जर असे होऊ शकले नाही, तर संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी मिळून वरिष्ठ खेळाडूंसोबत कठोर शब्दात चर्चा केली पाहीजे. आम्हाला अपेक्षा आहे की, वरिष्ठ खेळाडू टी-२० क्रिकेटच्या हिशोबाने स्वतःमध्ये बदल करतील.
दरम्यान, आयपीएल २०२२ खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. रिषभ पंतच्या नेतृत्वात भारताने या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या मालिकेत इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीर जोडीने संघाला चांगली सुरुवात दिली. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत देखील हेच दोघे भारताच्या डावाची सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे.
परंतु इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराट, रोहित आणि राहुल उपलब्ध असतील. अशात रोहित आणि राहुल ही सलामीवीर जोडी डावाची सुरुवात करताना दिसू शकते. या दोघांनी भारतासाठी आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात दिली आहे. यावर्षी ऑक्टोबर आणि नेव्होंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौरा महत्वाचा मानला जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: पंतचा निराळा अंदाज, उमेश यादवच्या चेंडूवर जमिनीवर लोळत लगावला षटकार
अर्शदीप की उमरान? कोणाला मिळू शकते पहिल्या टी२० सामन्यात संधी, पाहा भारताची संभाव्य प्लेइंग ११
फक्त कौतुकच करावं अशी ब्रायन लाराची ४०० धावांची अविस्मरणीय खेळी