fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

दिग्गज क्रिकेटपटूची घरासमोर आलेल्या सफाई कर्मचाऱ्याला मारहाण!

मुंबई । बांगलादेशचा वादग्रस्त क्रिकेटपटू शब्बीर रहमान पुन्हा चर्चेत आला आहे. एका सफाई कर्मचाऱ्याला चापट मारल्याचा आरोप शब्बीरवर लावण्यात आला आहे. ही घटना रविवारी 31 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता घडली. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर आणि सफाई कामगारात मोठा वाद झाला होता.

दोघांच्या वादानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेवेळी, शब्बीर आणि सफाई कर्मचाऱ्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. या प्रकरणानंतर शब्बीरने त्या कर्मचाऱ्याची माफी मागितल्याचे वृत्त समोर येत आहे .

शब्बीर म्हणाला की, क्रिकेटवर माझे प्रेम आहे. तेच माझे जीवन आहे. मी क्रिकेटची शपथ घेऊन सांगतो, मी त्याला मारले नाही. कचरा घेऊन जाणारी गाडी माझ्या घरासमोर थांबली होती आणि त्यावेळी मी माझ्या पत्नीसोबत घराच्या समोर गाडी घेऊन आलो तेव्हा मी फक्त त्याला गाडी काढण्यासाठी सांगितलो. तो सफाई कर्मचारी गाडी न काढता, माझ्याकडे रागाने पाहू लागला आणि  मला काही अपशब्द बोलला.

मी बाहेर गाडीच्या बाहेर उतरून आलो आणि त्याला विचारले की तू मला का अपशब्द बोललास. मी त्याला मारहाण केली नाही. उलट त्याच सफाई कर्मचाऱ्याने माझ्या घरी माझ्या आई वडिलांना धमकी दिली असल्याचे शब्बीरने सांगितले.

You might also like