भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण करणारा एकमेव फलंदाज आहे. त्याला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. सचिनने १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावली असली तरी, तो अनेकदा नर्वस नाईंटीजचा (९० ते ९९ धावांच्या दरम्यान बाद होणे) शिकारी ठरला आहे. त्यापैकीची एक नर्वस नाईंटीजची घटना १४ वर्षांपूर्वी घडली होती.
अशी घडली घटना
ब्रिस्टल येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यादरम्यान सचिन ९९ धावांवर फलंदाजी करत असताना इंग्लंडचा अष्टपैलू ऍण्ड्रू फ्लिंटॉफ सचिनसमोर गोलंदाजी करत होता. फ्लिंटॉफने ३२ व्या षटकातील तिसरा चेंडू टाकला. बाऊन्सर पद्धतीचा हा चेंडू अडविण्यासाठी सचिनने आपले दोन्ही हात चेहऱ्यासमोर आणले. चेंडू त्याच्या आर्म गार्डला स्पर्श केल्यासारखे वाटले. उंच उडालेला चेंडू यष्टिरक्षक मॅट प्रायरने झेलला. फ्लिंटॉफने जोरदार अपील केले आणि पंच इयान गोल्ड यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला बाद दिले.
सामन्यात भारताचा विजय
प्रथम फलंदाजी करताना भारताने ७ गडी गमावून ३२९ धावा केल्या. ज्यात सचिनच्या ९९ धावा व्यतिरिक्त राहुल द्रविडने नाबाद ९२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडने चांगली कामगिरी केली. मात्र, हे सर्व विजय नोंदवण्यासाठी पुरेसे नव्हते आणि इंग्लंडला ८ गडी गमावून ३२० धावाच करता आल्या. भारतीय गोलंदाज मुनाफ पटेल आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. शानदार नाबाद खेळीसाठी राहुल द्रविड याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सचिनच्या नावे सर्वाधिक शतके
सचिन तेंडुलकरने आपल्या २४ वर्षाच्या कारकिर्दीत असंख्य विक्रमांना गवसणी घातली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ तर, वनडे क्रिकेटमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केल्यानंतर २०१३ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/afghanistan-fast-bowler-naveen-ul-huq-statement-on-taliban-rul-in-afghanistan/
देशासाठी ७१ कसोटी खेळून एकही वनडे सामना खेळायला न मिळालेल्या दिग्गजाची गोष्ट
वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणारी ‘दिप्ती शर्मा’