बीसीसीआयने महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले. यावर्षीपासून बीसीसीआय वुमेन्स प्रीमियर लीग आयोजित करणार आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामासाठी बीसीसीआयने सोमवारी (13 फेब्रुवारी) खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. लिलावात भारत आणि विदेशातील काही खेळाडूंवर कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. याच लिलावाचा सदर्भ जोडत सचिन तेंडुलकरने मगंळवारी (14 फेब्रुवारी) एक सुंदर व्हिडिओ शेअर केला.
वुमेन्स प्रीमियर लीगचा पहिला आणि ऐतिहासिक लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईत आयोजित केला गेला. डब्ल्यूपीएलच्या या पहिल्या हंगामात एकूण पाच संघ खेळणार आहेत. या पाचही संघांनी महिला खेलाडूंना खरेदी करण्यासाठी पैशाच्या अक्षरशः पाऊस पाडला. महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी हे लिलाव खूप महत्वाचा असल्याचे काही क्रिकेट जाणकारांचे मत आहे. महिला क्रिकेटला येत्या काळात चांगले दिवस आणण्यासाठी डब्ल्यूपीएल महत्वाचे राहणार आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या मते लिलिवानंतर महिला क्रिकेटला चांगले दिवस आले देखील आहेत.
सचिनने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ एका खेडेगावाचा आहे आणि काही लहान मुलं-मुली क्रिकेट खेळत आहेत. व्हिडिओतील मुलगी भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव याचे अनुकरण करताना दिसत आहे. सूर्यकुमार ज्या पद्धतीने स्टंप्टच्या बाहेर जाऊन शॉट्स खेळतो, त्या पद्धतीने ही लहान मुलगी शॉट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. सचिनने या व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “कालच लिलाव झाला आणि आज सामना सुरू देखील झाला? मी या खेळीचा आनंद घेतला.”
Kal hi toh auction hua.. aur aaj match bhi shuru? Kya baat hai. Really enjoyed your batting. 🏏👧🏼#CricketTwitter #WPL @wplt20
(Via Whatsapp) pic.twitter.com/pxWcj1I6t6
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 14, 2023
सचिनने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, डब्ल्यूपीएलच्या लिलावाचा विचार केला, भारतीय सलामीवीर स्म्रिती मंधाना सर्वात महागडी खेळाडू ठरली. आरसीबीने स्म्रितीला खरेदी करण्यासाठी 3.40 कोटी रुपये खर्च करून स्म्रितीला ताफ्यात जोडले. लिलिवात भारतीय संघासाठी खेळणाऱ्या एकूण 10 खेळाडूंना 1 कोटी रुपयांपेक्षा कमी अधिक किंमतीमध्ये खरेदी केले गेले. (Sachin Tendulkar has shared a video of a rural girl batting like Suryakumar Yadav)
हास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय महिलांचं नशीब फळफळलं! WPL लिलावात ‘या’ 10 खेळाडूंना मिळाले 1 कोटीपेक्षा जास्त रुपये, स्म्रीती टॉपर
माजी प्रशिक्षकाचा सचिनवर गंभीर आरोप! म्हणाले, ‘मी संघ जॉईन केल्यानंतर सचिन…’