---Advertisement---

सचिनने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या प्रारुपाविषयी उपस्थित केला प्रश्न, म्हणाला…

On: गुरूवार, जून 17, 2021 2:41 AM
Sachin-Tendulkar
---Advertisement---

प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा हा ऐतिहासिक सामना एजबॅस्टन येथील रोज बाऊल स्टेडियमवर खेळला जाईल. मात्र, अंतिम सामना जवळ आला तरी, या स्पर्धेच्या प्रारुपावर केली जाणारी टिका अजूनही थांबली नाही. आता यादीमध्ये नवीन नाव भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे जोडले गेले आहे. सचिनने सरळ अंतिम सामन्याचा विजेता कसा निवडला जावा याविषयी भाष्य केले.

सचिनने केली ही सूचना
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर असलेला भारताचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या प्रारुपाविषयी प्रश्न उपस्थित केला. तसेच, विजेत्या संघाचा निकाल कसा लागावा याविषयी बोलताना तो म्हणाला, “जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेत्याचा निर्णय एकाच अंतिम सामन्याने झाला नाही पाहिजे. यासाठी बेस्ट ऑफ थ्री हा पर्याय योग्य वाटतो. वनडे व टी२० च्या विश्वचषकांमध्ये अशा प्रकारचा एकच सामना खेळणे योग्य ठरते.”

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री व अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांनीदेखील बेस्ट ऑफ थ्री फायनलचे समर्थन केले होते.

असे होते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे प्रारूप
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०१९ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला सुरुवात केली होती. त्यावेळी प्रत्येक संघाला घरच्या मैदानांवर तीन व परदेशात तीन अशा मालिका खेळविण्यात येणार होत्या‌. भारतीय संघाने घरच्या मैदानांसह ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये मालिका विजय मिळवले आहेत. तर, न्यूझीलंडने सर्व मालिका घरच्या मैदानावर खेळला होत्या. कोविड-१९ मुळे आधीचे गुणांकन पद्धत रद्द करून स्पर्धेसाठी टक्केवारी पद्धत सुरू केली गेली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

WTC फायनल गाजण्यासाठी ‘भारत आर्मी’ तयार, आयसीसीने स्वतः पोस्ट केला व्हिडिओ

जेव्हा धोनीची मुलगी सीएसकेला नाही तर मुंबई इंडियन्सला करते चिअर, रोहित शर्माने शेअर केला व्हिडिओ

गावसकरांचा सल्ला, ‘त्या’ दोन खेळाडूंना WTC फायनलमध्ये टीम इंडियाकडून जरूर खेळवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---